AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! ..हा तर लोकशाहीवरील घाला, 42 माजी न्यायाधीशांचं थेट देशाच्या नावानं खुलं पत्र, मोठी खळबळ

मोठी बातमी समोर येत आहे, सध्या देशात विविध आंदोलन सुरू आहेत. निवडणूक आयोगाविरोधात काँग्रेसह विरोधी पक्षाने चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे. दुसरीकडे एमपीएससीच्या अध्यक्षांविरोधात देखील आंदोलन सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर आली आहे.

मोठी बातमी! ..हा तर लोकशाहीवरील घाला, 42 माजी न्यायाधीशांचं थेट देशाच्या नावानं खुलं पत्र, मोठी खळबळ
42 माजी न्यायाधीशांचं पत्र Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 08, 2026 | 10:29 PM
Share

प्रमोद उगले, प्रतिनिधी : मोठी बातमी समोर येत आहे, सध्या देशात विविध आंदोलनं सुरू आहेत. निवडणूक आयोगाविरोधात काँग्रेसह विरोधी पक्षाने चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसने आज सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन केलं आहे. विरोधी पक्षांकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्या राजीन्याम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. तर दुसरीकडे एमपीएससीचे अध्यक्ष भीमनवार यांच्या राजीनाम्याची देखील मागणी होत आहे. त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देखील विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन उभारलं होतं, आता या सर्व पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे. देशातील 42 माजी न्यायधीश एकवटे असून, त्यांनी थेट देशाच्या नावाने खुलं पत्र लिहिलं आहे. या पत्राने मोठी खळबळ उडाली आहे.

माजी न्यायाधीशांनी पत्रात नेमकं काय म्हटलं?

निवडणूक आयोग , न्यायव्यवस्था आणि देशातील स्वायत्त घटनात्मक संस्थांवर सातत्याने होत असलेल्या राजकीय हल्ल्यांविषयी आणि बिनबुडाच्या आरोपांविषयी या पत्रांमधून चिंता व्यक्त करण्यात आली आहे.  देशातील 42 निवृत्त न्यायमूर्तींनी देशाच्या नावे एक उघड पत्र लिहिले आहे. “लोकशाही संस्थांची समीक्षा करणे हा तात्विक अधिकार आहे, मात्र त्यांचा अवमान करणे अयोग्य आहे,” असे स्पष्ट मत व्यक्त करत या निवृत्त न्यायाधीशांनी पुराव्यांशिवाय चालवल्या जाणाऱ्या मोहिमांमुळे लोकशाहीवरील जनतेचा विश्वास उडू शकतो, असा इशारा दिला आहे. राजकीय फायद्यासाठी ‘चोर’ किंवा ‘कटपुतली’ यांसारख्या शब्दांचा वापर करून घटनात्मक संस्थांची प्रतिमा मलिन करण्याच्या प्रयत्नांचा त्यांनी या पत्राच्या माध्यमातून तीव्र निषेध केला आहे.

दरम्यान या पत्राच्या माध्यमातून सध्या विरोधी पक्षांकडून ज्या विविध घटनात्मक संस्थांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे, त्यावर निशाणा साधण्यात आला आहे. ज्या पद्धतीने या आंदोलनातून घटनात्मक संस्थांवर किंवा त्यांच्या प्रमुखांवर आरोप होत आहेत, त्यावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. तसेच या आरोंपाबाबत चिंता देखील व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान आता या पत्रावर विरोधकांकडून काय प्रतिक्रिया येणार हे पहाणं महत्त्वांच ठरणार आहे.

Follow Us
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हास
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हासनगरच्या विकासासाठीही मोठ्या घोषणा
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला...
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला प्रतिष्ठित ब्लू फ्लॅग पुरस्कार
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना...
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना राष्ट्रवादीचा इशारा!
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील चारा-पाणीटंचाईचे संकट
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील हजारो जनावरांवर चारा-पाणीटंचाईचे संकट
डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं...
Supriya Sule : डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं उत्तर
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने...
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने भाजप-ठाकरे गट आमनेसामने, नगरसेवकांचा सभात्याग
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन फाईल्स'साठी आंदोलनाचा इशारा!
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल; थेट...
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना विधान भोवलं
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना सुरज चव्हाणांचा थेट इशारा
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला...
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला; संजय राऊतांवरही साधला निशाणा!