Operation Sindoor : भारत पाकिस्तान युद्धात किती लढाऊ विमानं पाडण्यात आले? डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितला धक्कादायक आकडा
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये चांगलाच तणाव निर्माण झाला होता, युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती, दरम्यान या काळात किती लढाऊ विमान पाडण्यात आली? याबाबत आता डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केला आहे.

पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, यानंतर भारतानं पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला. पाक व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये करण्यात आलेल्या या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांची अनेक ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आले. या एअर स्ट्राईकला भारतानं ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं होतं, या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तानमध्ये असलेले शंभर पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले.
दरम्यान भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर दोन्ही देशांमध्ये चांगलाच तणाव निर्माण झाला. पाकिस्तानने देखील भारतावर हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले परतून लावले, पाकिस्तानचे अनेक ड्रोन पाडण्यात आले, यामध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं. दरम्यान पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून भारतानं पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचे अनेक एअर बेस उद्ध्वस्त करण्यात आले. याचा मोठा फटका हा पाकिस्तानला बसला.
दरम्यान त्यानंतर तणाव अधिक वाढत असल्याचं दिसत असतानाच भारत आणि पाकिस्तानने युद्धविरामाची घोषणा केली, युद्ध विरामाची घोषणा करताना भारतानं पाकिस्तान समोर काही अटी ठेवल्या होत्या, मात्र दुसरीकडे आपल्या मध्यस्थीमुळेच दोन्ही देशांनी युद्धविरामाची घोषणा केली असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता, परंतु भारतानं त्यांचा हा दावा फेटाळून लावला. मी दोन्ही देशांना युद्ध थांबलं नाही तर 200 टक्के टॅरिफ लावेल अशी धमकी दिली होती, त्यानंतर हे युद्ध थांबल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. भारतानं त्यांचा हा दावा फेटाळून लावल्यानंतर देखील त्यांनी अनेकदा अशाच प्रकारचा दावा केला आहे.
दरम्यान भारत पाकिस्तान युद्ध सुरू असताना किती विमानं पाडली गेली? याबाबत त्यांनी आता धक्कादायक दावा केला आहे. भारत आणि पाकिस्तान युद्धात एकूण सात लढाऊ विमान पडल्याचं त्यांनी म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे. तसेच यावेळी बोलताना त्यांनी भारत रशियाकडून करत असलेल्या कच्च्या तेलाच्या खरेदीवर देखील नाराजी व्यक्त केली आहे, ही तेलाची खरेदी थांबली नाही तर आहे, त्यापेक्षा अधिक टॅरिफ लावू असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
