
दहशतवाद पोसणाऱ्या पाकड्यांना भारताने धडा शिकवला. पण ऑपेशन सिंदूर योजना कशी अंमलात आणली, त्यामागील डावपेच याविषयीची सविस्तर माहिती पहिल्यांदाच समोर आली. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सार्वजनिकरित्या त्याची माहिती दिली. आयआयटी मद्रास येथील भारतीय लष्कराच्या संशोधन शाखेतील अग्निसोधच्या उद्घाटन कार्यक्रमात त्यांनी मोठे वक्तव्य केले. ऑपरेशन सिंदूरची रणनीती बुद्धिबळ खेळण्यासारखी होती, असे ते म्हणाले.
हे यु्दध ग्रे झोनमध्ये
ऑपरेशन सिंदूर एका ग्रे झोनमध्ये झाले. हे युद्ध जसे अनपेक्षित होते तसेच ते पारंपारिक लष्करी चकमकीपेक्षा थोडेसे वेगळे होते. ऑपरेशन सिंदूरमध्ये म्हणजे बुद्धिबळ खेळण्यासारखं होतं. कारण आम्हाला शत्रू काय प्रतिक्रिया देईल आणि आम्ही काय करणार, याचा काहीच अंदाज नव्हता. हा एक ग्रे झोन होता. ग्रे झोन म्हणजे पारंपारिक युद्ध नक्कीच नव्हते तर ही गोष्ट पूर्णपणे वेगळी होती. लष्कराने पारंपारिक ऑपरेशन्सपेक्षा हटके भूमिका घेतली.
संरक्षण मंत्र्यांनी लष्कराला सांगितले काय?
ऑपरेशन सिंदूरची तयार 23 एप्रिलपासून सुरू झाली. त्यावेळी तीनही सैन्य दलाचे प्रमुखांनी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी निर्णायक कारवाई, पाकिस्तानला धडा शिकवणे गरजेचे असल्याचे ठामपणे ठरवले. संरक्षण मंत्री म्हणाले की आता हे फार झाले आता कारवाई आवश्यक आहे. त्यावेळी तीनही सैन्य दलाच्या प्रमुखांच्या मनात सुद्धा हाच विचार होता. अर्थातच लष्कराला कारवाईसाठीचे संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले होते.
उरी आणि बालाकोटपेक्षा वेगळे ऑपरेशन सिंदूर
25 एप्रिल रोजीच उत्तरी कमांडने अगोदरच 9 नियोजीत पैकी 7 लक्ष्यांवर हल्ला करण्याची तयारी केली होती. अनेक दहशतवादांचा खात्मा केला होता. ऑपरेशन सिंदूर उरी आणि बालाकोट सारख्या मोहिमांपेक्षा खासा वेगळेच होते. 29 एप्रिल रोजी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिल्यांदाच भेटलो. ऑपरेशन सिंदूर या छोट्या नावाने अवघा देश जोडल्या गेला. अनेक जण प्रश्न विचारत आहेत की, भारत का थांबला. जर तुम्ही एखाद्या पाकिस्तानी नागरिकाला विचारले की तुम्ही जिंकले की हारले, तर तो सांगेल आमचा आर्मी चीफ, हा फील्ड मार्शल झाला, असे खास उत्तर लष्कर प्रमुखांनी दिले. भारताने पाकचे कंबरडे मोडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ऑपरेशन उरी हे एक स्पष्ट संदेश देण्यासाठी राबवण्यात आले. त्यात दहशतवाद्यांचे लाँच पॅड्स उद्धवस्त झाले. 2019 मधील बालाकोट हल्ला हे प्रत्युत्तर होते. पाकिस्तानमधील दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांना लक्ष करण्यात आले. तर ऑपरेशन सिंदूर त्यापेक्षा अधिक व्यापक होते. शत्रूच्या घरात घुसून तिथले दहशतवादी अड्डे उद्धवस्त करण्यात आले. त्यांची महत्त्वपूर्ण ठिकाणं नष्ट करण्यात आल्याची माहिती लष्कर प्रमुखांनी दिली.