भारताची ही तयारी पाहून पाकिस्तान घाबरला, अन्यथा कराची समुद्रात बुडाले असते…भारतीय नौदलाचे बोट होते ट्रिगरवर
पाकिस्तानच्या सीमेजवळ भारतीय युद्धनौका आणि पाणबुड्या हल्ला करण्याच्या तयारीत होत्या. संपूर्ण पाकिस्तानी नौदल भारतीय नौदलाच्या लक्ष्यावर होते आणि भारतीय नौदलाचे बोट ट्रिगरवर होते.

Operation Sindoor Indian Navy: भारत आणि पाकिस्तान तणावा दरम्यान भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. पाकिस्तानमधील दहशतवादी तळ नष्ट करण्याचे उद्दीष्ट ऑपरेशन सिंदूरचे होते. भारताच्या तिन्ही सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूरसाठी तयारी केली होती. भारतीय नौदलाने समुद्रात पाकिस्तानला वेढले होते. यामुळे पाकिस्तानकडून समुद्रातून भारतावर हल्ला करण्याचा एकही प्रयत्न झाला नाही. भारताने ब्राह्मोसने सुसज्ज युद्धनौका तैनात केल्या होत्या. लढाऊ विमानांनी सुसज्ज विमानवाहू जहाजे तयार होती. भारताला त्याचा वापर करावा लागला असता तर पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात विनाश घडला असता. भारताच्या नौदलाच्या तयारीमुळे आणि शक्तिशाली युद्धनौकेच्या तैनातीमुळे पाकिस्तान घाबरला होता.
पाकिस्तानच्या समुद्र सीमेजवळ भारताच्या युद्धनौका होत्या. त्या युद्धनौकांमधून कराचीवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव करता आला असता. भारतीय नौदलाच्या म्हणण्यानुसार, पहलगाम हल्ल्यानंतर नौदलाने आपली तयारी सुरु केली होती. पाकिस्तानविरुद्ध कारवाई करण्यासाठी पावले उचलली होती. पाकिस्तानच्या सीमेजवळ भारतीय युद्धनौका आणि पाणबुड्या हल्ला करण्याच्या तयारीत होत्या. संपूर्ण पाकिस्तानी नौदल भारतीय नौदलाच्या लक्ष्यावर होते आणि भारतीय नौदलाचे बोट ट्रिगरवर होते.
वृत्तानुसार, पहलगाम हल्ला २२ एप्रिल रोजी झाला होता. त्यानंतर २३ एप्रिलपासून भारताच्या नौदलाच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. भारतीय नौदलाच्या पश्चिम कमांडने पाकिस्तानविरुद्ध अरबी समुद्रात आपली तैनाती वाढवली होती. अवघ्या काही दिवसांतच भारताचे विमानवाहू जहाज पाकिस्तानच्या सीमेजवळ पोहोचले होती. तसेच भारतीय युद्धनौका आणि पाणबुड्या देखील पाकिस्तानजवळ तैनात करण्यात आल्या.
ऑपरेशन सिंदूरसाठी तिन्ही सैन्य दलाची तयारी होती. भारतीय नौदलाने समुद्रात पाकिस्तानला घेरले होते. त्यामुळे पाकिस्तानच्या युद्धनौका बंदरांभोवती होत्या. कारण ब्राह्मोसने सुसज्ज युद्धनौका आणि लढाऊ विमानांनी सुसज्ज विमानवाहू जहाजे पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात विनाश घडवू शकली असती. समुद्रात भारताची तयारी आणि भारतीय युद्धनौकांची ताकद यामुळे पाकिस्तान घाबरला होता. दहशतवादी हल्ल्याच्या ९६ तासांच्या आतच भारताने अरबी समुद्रात युद्ध रणनीतीची चाचणी घेतली. हल्ल्यासाठी नौदल पूर्णपणे तयार असल्याची खात्री केली.
