Operation Sindoor : पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, भारताच्या एअर स्ट्राईकनंतर केले चार मोठे दावे
मध्यरात्री भारताने मोठी कारवाई केली आहे, पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेल्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर एअर स्ट्राईक करण्यात आला. या हल्ल्यात दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त झाले आहेत. मात्र आता पाकिस्तानकडून वेगळाच दावा करण्यात आला आहे.

पहलगामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यामध्ये 26 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला तर अनेक जण जखमी झाले होते. अखेर या दहशतवादी हल्ल्याचा भारतानं बदला घेतला आहे. पाकिस्तानच्या घरात घुसून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. पीओके आणि पाकिस्तानमध्ये भारतानं मोठी कारवाई केली आहे. मध्यरात्री भारताकडून दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर एअर स्ट्राईक करण्यात आला, या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेले दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. ऑपरेशन सिंदूर असं या मिशनला नाव देण्यात आलं आहे.
भारतानं पाकिस्तावर एअर स्ट्राईक केला. दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले, त्यानंतर आता पाकिस्तानकडून मोठा दावा करण्यात आला आहे. भारतानं पाकिस्तानच्या 9 ठिकाणी नाही तर सहा ठिकाणी हल्ला केल्याचं पाकिस्तानच्या लष्करी प्रवक्त्यानं म्हटलं आहे. भारतानं पाकिस्तानमधील फक्त दहशतवादी अड्ड्यांना लक्ष्य केलं आहे, एअर स्ट्राईकमध्ये फक्त दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर कारवाई करण्यात आली. या हल्ल्यामध्ये एकाही पाकिस्तानी नागरिकाचा मृत्यू झालेला नाही.
मात्र असं असताना देखील आमचे 26 नागरिक मारले गेले तसेच 46 जण जखमी झाल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला आहे. पाच भारतीय लढाऊ विमानं पाडल्याचा दावा देखील पाकिस्तानने केला आहे. दरम्यान पाकिस्तान आणि पीओकेमध्ये भारतानं जिथे एअर स्ट्राईक केला तिथे दहशतवाद्यांचे अड्डे नव्हतेच अशा उलट्या बोंबा मारायला देखील पाकिस्तानने आता सुरू केलं आहे.
भारतानं या मिशनला ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं आहे. मध्यरात्री भारतानं पीओके आणि पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला. या एअर स्ट्राईकमध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील 5 तर पाकिस्तानमधील 4 अशी एकूण 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आली आहे. या हल्ल्यामुळे पाकिस्तानची झोप उडली असून, पंजाबमधील लाहोर ते पाकव्याप्त काश्मीरपर्यंत चांगलाच हाहाकार माजला आहे. पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात नागरिकांना त्यांचा धर्म विचारून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला, या घटनेत 26 जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते, याचा बदला आता घेण्यात आला आहे.
