Pahalgam Terror Attack: काश्मीरमध्ये अडकलेत तुमचे नातेवाईक? तात्काळ ‘या’ नंबरवर कॉल करा, लगेच मिळेल माहिती
Pahalgam Terror Attack: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबद्दल लोकांना माहिती देण्यासाठी एक मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तुमचे कोणी नातेवाईक तिकडे अडकले असतील तर 'या' नंबरवर कॉल करा, लगेच मिळेल माहिती

Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. हल्ल्यात जवळपास 27 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. तर अनेक जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर सध्या उपचार सुरु आहेत. पर्यटन स्थळावर झालेल्या हल्ल्यानंतर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या नातेवाईकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. यामुळे अनंतनाग पोलिसांनी जखमी आणि मृतांची माहिती मिळविण्यासाठी पर्यटकांसाठी 24/7 आपत्कालीन मदत कक्ष जारी केला आहे. त्याचे मुख्यालय अनंतनाग येथील पोलिस नियंत्रण कक्षात बांधण्यात आले आहे.
पर्यटकांच्या नातेवाईकांना किंवा पर्यटकांना मदत किंवा माहितीची आवश्यकता असलेल्या मदत करण्यासाठी अनंतनाग पोलिस नियंत्रण कक्षात एक मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. पोलिसांनी तीन फोन नंबर दिले आहे. ज्यावर संपर्क साधून नातेवाईकांबद्दल माहिती मिळवू शकता.
फोन नंबर: 9596777669, 01932225870
व्हाट्सएप नंबर: 9419051940
सांगायचं झालं तर, हल्ल्याची माहिती मिळताच गृहमंत्री अमित शाह देखील जम्मू – काश्मिरमध्ये पोहोचले आहेत. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहा यांच्याशी बोलून त्यांना केंद्रशासित काश्मिर येथे जाण्यास सांगितलं.
लोकांनी मेणबत्त्या पेटवल्या आणि काढला कँडल मार्च
VIDEO | J&K: Locals of Pahalgam hold candle march for terror attack victims demanding justice.
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/F19rAK7tFf
— Press Trust of India (@PTI_News) April 22, 2025
जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला येथे पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात स्थानिक लोकांनी कँडल मार्च काढून निषेध केला. दरम्यान, श्रीनगरमध्ये स्थानिक लोकांनी मेणबत्त्या पेटवून निषेध केला. मंगळवारी झालेल्या हल्ल्यात अनेकांना अपले प्राण गमवावे लागले आहेत. अनंतनाग, पहलगाम, कुपवाडा, बारामुल्ला, बांदीपोरा, पुलवामा, बडगाम, शोपियान, श्रीनगर येथे मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कँडल मार्च काढण्यात आला.
