India-Pakistan War : 100 तासात 5 तुकडे… युद्ध झाल्यास पाकिस्तानची अशी हालत का होईल, ते समजून घ्या
India-Pakistan War : पाकिस्तान ज्या मिसाइल्सची फायर पावर दाखवत आहे, ती अनेक दशकं जुनी आहेत. अब्दाली मिसाइलच मिलिट्री नाव हत्फ-2 आहे. हत्फ-2 एक बॅलेस्टिक मिसाइल आहे. याची रेंज 180 किलोमीटर आहे. 1995 मध्ये पाकिस्तानने हत्फ मिसाइल प्रोग्राम सुरु केलेला. या मिसाइल प्रोग्रामला अहमद शाह अब्दाली कोडनेम दिलं होतं.

पाकिस्तानी सैन्य भारताविरोधात ताकत दाखवण्यासाठी पोकळ शक्ती प्रदर्शन करत आहे. दोन दिवसात पाकिस्तानने दोन क्षेपणास्त्र चाचण्या केल्या आहेत. शनिवारी अब्दाली आणि त्यानंतर फतह मिसाइलची चाचणी केली आहे. इथे भारताने आपल्या पुढच्या पिढीची अत्याधुनिक नेक्स्ट जेनरेशन मिसाइल ब्रह्मोसला वॉर ड्यूटीवर तैनात केलं आहे. त्यामुळे इस्लामाबादमध्ये इमर्जन्सीसारखी स्थिती आहे. पाकिस्तानला स्वत:च्या युद्ध क्षमतेवर विश्वास नसल्यामुळे पाकिस्तानी टॉप जनरल्समध्ये चिंता आहे. पाकिस्तानी सैन्याकडे लढण्यासाठी दारुगोळ्याचा साठा अत्यंत कमी आहे. ज्यामुळे ते 100 तासही तग धरु शकणार नाहीत. म्हणजे उद्या युद्ध झाल्यास पाकिस्तानचे 100 तासांच्या आता पाच तुकडे होऊ शकतात. युद्ध लढण्यासाठी आर्थिक शक्ती लागते. मूळात आज पाकिस्तानची ती आर्थिक ताकदच राहिलेली नाही. हे त्यांना सुद्धा चांगलं ठाऊक आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, “तुम्ही आपल्या पंतप्रधानांना चांगले ओळखता. त्यांची कार्यशैली तुम्हाला माहित आहे. त्यांच्या दृढ निश्चियाची तुम्हाला कल्पना आहे. धोका पत्करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. मी तुम्हाला आश्वसत करतो, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली जसं तुम्हाला पाहिजे, तसच होईल” दहशतवादाच पालन पोषण करणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने ऐतिहासिक तयारी केली आहे. इंडियन एअर फोर्स आता हाय-टेक HAPS म्हणजे हाय-एल्टीट्यूड प्लॅटफॉर्म सिस्टम्स विकत घेणार आहे. संरक्षण मंत्रालयाने तीन HAPS प्लॅटफॉर्म्ससाठी RFI म्हणजे रिक्वेस्ट फॉर इन्फॉर्मेशन जारी केलं आहे. हे सौर ऊर्जेवर चालणारे दीर्घकाळ उड्डाण करण्यास सक्षम UAV आहेत. 16 ते 20 किलोमीटर उंचीवरुन उड्डाण करु शकतात.
HAPS सिस्टिमचा फायदा काय?
या ड्रोनद्वारे पाकिस्तानसह देशाच्या शत्रूंच्या हालचालीवर लक्ष ठेवणे आणि सैन्य माहिती गोळा केली जाईल. हे ड्रोन शत्रूच्या इलेक्ट्रॉनिक घडामोडींची माहिती सैन्याला देईल. त्यासोबतच पाकिस्तानचा सामना करण्यासाठी भारताने आपलं अत्याधुनिक ब्रह्मोस मिसाइल वॉर ड्युटीवर तैनात केलं आहे. भारताने राफेलमध्ये ब्रह्मोस-NG क्रूज मिसाइल फिट करायला परवानगी दिली आहे. यामुळे देशाची एअर आणि नौदल क्षमता अधिक घातक आणि अचूक होईल. सध्या भारताकडे स्काल्प, रुद्रम, अस्त्र सारखी क्रूज मिसाईल्स आहेत. सध्या ब्रह्मोस NG चा वेग आणि रेंजमध्ये नवीन क्षमता विकसित होणार आहे.
