Pahalgam Firing Video :अल्लाह हू अकबरचा नारा नि गोळीबार… पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर आला, पुढे एकच थरार
Pahalgam Terrorist Attack : 22 एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन दरी परिसरात दहशतवाद्यांनी निरपराध पर्यटकांना गोळ्या घातल्या. त्याचे काही व्हिडिओ समोर आले होते. आता आणखी नवीन व्हिडिओ समोर आले आहेत. त्यात पर्यटकांची धावपळ, गोळीबार आणि थरार टिपल्या गेला आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर आले आहेत. त्यात बैसरन दरी परिसरात पर्यटक विविध खेळात रमलेले दिसतात. एक पर्यटक जिपलाईनवर जात असतानाच अचानक गोळीबार होतो. त्याचे आवाज स्पष्टपणे ऐकू येतात. पर्यटकाला या गोळीबाराची कल्पनाच नसल्याचे दिसते. तो त्याच्याच मस्तीत दिसतो. तो व्हिडिओ शूट करताना दिसतो. हा व्हिडिओ अवघ्या काही सेकंदांचा आहे. त्यात गोळीबार सुरू असल्याचे स्पष्टपणे ऐकू येते. 22 एप्रिल रोजी झालेल्या या हल्ल्यात 26 पर्यटकांना त्यांचे प्राण गमवावे लागले. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचे ढग जमा झाले आहेत. भारत येत्या चार दिवसात हल्ला करणार असल्याचा दावा पाकिस्तानचे मंत्री करत आहेत.
अल्लाह हू अकबर
सोमवारी या दहशतवादी हल्ल्याचा एक व्हिडिओ समोर आला. त्यात बैसरन या ठिकाणी पर्यटक हा जिपलाईनचा आनंद घेताना दिसतो. त्याचवेळी तो व्हिडिओ रेकॉर्ड करताना दिसतो. ऋषी नावाच्या व्यक्तीने हा व्हिडिओ शूट केला आहे. हा व्यक्ती जिपलाईनचा आनंद लुटत होता. त्याचवेळी व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. खाली गोळीबाराचा आवाज येत होता, पण त्याची त्याला काहीज जाणीव झाले नसल्याचे व्हिडिओत दिसते. तर गोळीबार होतानाच जिपलाईन ऑपरेटर अल्लाह हू अकबर असे म्हणताना दिसतो. पण त्याचे दहशतवादी कनेक्शन आहे की नाही, हे काही समोर आले नाही. हा केवळ योगायोग होता की त्याला काही माहिती हे अजून समोर आले नाही.
shocking एक आदमी जिप लाइन पर था जब फायरिंग हुई, वो हंसते हुए वीडियो रिकॉर्ड करता रहा,लोग इधर-उधर भागते हुए नजर आ रहे हैं #PahalgamTerroristAttack pic.twitter.com/RjZaPKwKRI
— Farheen Ansari (@Farheenansari26) April 28, 2025
पर्यटक ऋषीच्या दाव्यानुसार, गोळीबार झाल्याच्या 20 सेकंदनंतर आपल्याला त्याची जाणीव झाली. जिपलाईन ऑपरेटरची एकूणच हालचाल आपल्याला संशयास्पद वाटली. माझ्या अगोदर 9 जण जिपलाईनवर गेले. त्यावेळी हा ऑपरेटर एकदम सामान्य होता. त्याने रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओत ऑपरेटरच्या मागील एक व्यक्ती खाली बसून कोणतेतरी उर्दू भाषेतील पुस्तक वाचत असल्याचे ऋषीचे म्हणणे आहे. तो काही तरी पुटपुटत असल्याचा या पर्यटकाचा दावा आहे. या नवीन व्हिडिओनंतर जिपलाईन ऑपरेटर हा तपास यंत्रणेच्या रडारवर आला आहे. या व्हिडिओत तो थोडा अस्वस्थ दिसत आहे. त्याची हालचाल संशयास्पद असल्याचा पर्यटकाचा दावा आहे.
