Vaibhav Suryavanshi : वय अवघे 14 वर्ष आणि भरतो इतका टॅक्स, क्रिकेटर वैभव सूर्यवंशीवर तुम्ही पण व्हाल फिदा
Gujrat Titans Vaibhav Suryavanshi Tax : गुजरात टाईटन्सविरुद्ध ऐतिहासिक शतक ठोकणाऱ्या वैभव सूर्यवंशीची जगात चर्चा सुरू आहे. अवघ्या 14 वर्षांचा वैभवने, क्रिकेट विश्वात कामगिरी आणि कमाईने सुद्धा नावाप्रमाणेच वैभव प्राप्त केले आहे. त्याने किती भरला टॅक्स?

सोमवारच्या संध्याकाळी IPL 2025 मध्ये क्रिकेटर वैभव सूर्यवंशी याच्या नावाचा बोलबाला आहे. राजस्थान रॉयल्सच्या या छोटा पॅकेट बडा धमाक्याने एकच खळबळ उडवून दिली. त्याने गुजरात टाईटन्सविरुद्ध ऐतिहासिक शतक ठोकले. आयपीएल इतिहासात सर्वाधिक वेगाने त्याने शतक ठोकले. त्याने 37 चेंडूत दुसरे वेगवान शतक केले. त्यामुळे त्याचे नाव जगभर चर्चेत आले आहे.
राजस्थान रॉयल्सचा चौपट मोबदला
राजस्थान रॉयल्सने वैभव सूर्यवंशीला संघात स्थान दिले. त्यावेळी वैभवचे वय 13 वर्षे होते. त्याला चौपट मोबदला देऊन संघाने विकत घेतले. तो इतकी चमकदार कामगिरी करेल म्हणून कोणालाच त्यावेळी अंदाज नव्हता. पण वैभवने सर्वांनाच अचंबित केले. त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला सुद्धा दखल घ्यायला लावली. वैभव हा बिहारच्या मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. त्याने आयकर भरण्यात ही आघाडी घेतली आहे. इतक्या कमी वयात त्याने सरकारच्या तिजोरीत कर रुपात पैसा जमा केला आहे.
वैभव सूर्यवंशी कराच्या परीघात कसा?
अनेकांना प्रश्न पडला असेल की, वैभव तर 14 वर्षांचा आहे, मग त्याला आयकर कसा भरावा लागू शकतो? मीडिया वृत्तानुसार, राजस्थान रॉयल्स संघाने त्याला 1.10 कोटी रुपयांत खरेदी केले होते. त्याची कमाई ही विशिष्ट कर नियमातंर्गत येते. त्यामुळे त्याला कर द्यावा लागेल.
कमी वयाच्या अर्थात 18 वर्षांखालील वयाच्या मुला-मुलींनी त्यांच्या वैयक्तिक गुण वैशिष्ट्यांनी, बुद्धिमत्तेने कमाई केली तर ती कराच्या परीघात येते. यामध्ये क्रीडा, अभिनयासह इतर क्षेत्रातील कमाईचा समावेश होतो. ही कमाई आयकर नियमाच्या 64(1ए) अंतर्गत आई-वडिलांच्या कमाईसोबत जोडण्याऐवजी नाबालिक, मुलाच्या नावावर कर लावल्या जातो. ही कमाई वैयक्तिक कर स्लॅबवर अवलंबून आहे. त्यामुळे वैभव सूर्यवंशी याला सुद्धा आयकर रिटर्न भरने आवश्यक आहे. त्याला इतर खेळाडूंप्रमाणेच ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
मग वैभवला किती द्यावा लागेल आयकर?
वैभव सूर्यवंशीने वर्षभरातच क्रिकेटच्या माध्यमातून कोट्यवधींची कमाई केली. त्यात जाहिरांतीमार्फत होणाऱ्या कमाईचा समावेश नाही. त्याला राजस्थान रॉयल्सने 1.10 कोटी रुपयात खरेदी केले होते. त्याला आयकर अधिनियमानुसार, 30 टक्क्यांचा स्लॅब लागू होईल. त्यामुळे वैभवला 33 लाख रुपये कर रुपात जमा करावे लागले. 77 लाख रुपयांची कमाई झाली.
