AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आग लागल्याची अफवा पसरली, प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या टाकल्या, 20 प्रवासी जखमी

मेल-एक्सप्रेसचा प्रवास करताना अनेकदा केवळ अफवेने अनेकदा प्रवाशांचे बळी गेले आहेत. मुंबईतही मागे अशा घटना घडल्या आहेत. परंतू प्रवासी यातून धडा घेत नसल्याचे उघडकीस आले आहे.

आग लागल्याची अफवा पसरली, प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या टाकल्या, 20 प्रवासी जखमी
हा रेल्वे ट्रॅक सन 1903 मध्ये सुरु केला. 1916 मध्ये रेल्वे लाईनचे काम पूर्ण झाले होते. सन 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय रेल्वेने या कंपनीसोबत करार केला. त्यामुळे हा ट्रॅक वापरण्यासाठी त्यांना दरवर्षी कंपनीला रॉयल्टी द्यावी लागत होती.
| Updated on: Aug 11, 2024 | 3:14 PM
Share

हावड़ा येथून अमृतसर जाणाऱ्या ट्रेन क्रमांक 13006  अमृतसर हावडा मेल एक्सप्रेसच्या जनरल डब्यात आग लागल्याची अफवा पसरल्याने प्रवाशांनी ट्रेनमधून सरळ उड्या टाकल्या. त्यामुळे सुमारे 20 प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या सात प्रवाशांना शाहजहापूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे. अलिकडे ट्रेनचे अपघात वाढल्याने प्रवाशांना वाटले खरीच आग लागली आहे. त्यामुळे प्रवाशांनी चालत्या ट्रेनमधून उड्या टाकल्याचे उघडकीस आले आहे.

रविवारी सकाळी सुमारे 8:00 वाजताच्या दरम्यान बरेली आणि मीरानपुर कटरा स्टेशन दरम्यान अमृतसर हावडा मेलच्या जनरल कोचमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्याने चालकाने ट्रेनला ब्रेक लावले, तेव्हा अर्धी ट्रेन नदीच्या पुलावर आणि अर्धी ट्रेन पुलाच्या बाहेर उभी होती. ट्रेन थांबताच लोकांनी घाबरुन कोणताही विचार न करता बोगीतून पटापट उड्या टाकल्या.त्यामुळे अनेक प्रवासी जखमी झाले.

तपासणीअंती सर्व काही ठीक

या घटनेत अनेक प्रवासी केवळ घाईगडबडीत उडी टाकल्याने जखमी झाले आहेत. बोगी रिकामी झाल्यानंतर ट्रेनच्या डब्याची तपासणी केली गेली. तेव्हा कुठेही काही जळल्याचे पुरावे सापडले नाहीत. त्यानंतर जखमी प्रवाशाना महिला आणि गार्ड बोगीतून शाहजहापूर येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले. तेथील सरकारी रुग्णालयात सर्वांना दाखल केले आहे.

शाहजहापुर स्टेशनवर थांबिवली ट्रेन

रविवार सकाळी 10:10 वाजता ट्रेनला शाहजहांपुर रेल्वे स्टेशनवर प्लेटफॉर्म नंबर एक वर थांबविले रेल्वेचे अधिकारी आणि आरपीएफ जवान घटनास्थळी पोहचले. पाच एम्ब्युलन्सना बोलावून जखमींना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळे ट्रेन अर्धा तास थांबली होती. तपासणी अंती कोणताही अनुचित प्रकार आढळला नाही. त्यामुळे ट्रेनला पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले.

टवाळखोर तरुणांचे कृत्य

बिलपुरजवळ सकाळी काही टवाळखोर तरुणांनी ट्रेन नंबर 13006 च्या जनरल जीएस कोचमधील ठेवलेले अग्निशमन यंत्र चालवले.त्यामुळे गाड़ीला थांबविण्यात आले. त्यामुळे डब्यात धुर पसरल्याने लोकांना वाटले ट्रेनला आग लागली,आणि प्रवाशांनी उड्या मारल्या. अनेक प्रवासी त्यामुळे जखमी झाले. या टवाळखोर प्रवाशांचा शोध घेतला जात आहे.

Follow Us
गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
Rahul Gandhi | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि...
JP Nadda | नीट आंदोलनाला मोठं यश; जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि परीक्षा सुधारणांवरही सकारात्मक निर्णय
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक..
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक...
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबत
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबतच्या बैठकीत मोठा निर्णय
तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
Raj Thackeray | तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने...
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया
Sharad Pawar | धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपके...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपकेच्या विधानेने अनेकाच्या भुवया उंचावल्या
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?; त्या बड्या नेत्याने नावच सांगून टाकलं