बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज, दुसऱ्या टप्प्यातील प्रचारासाठी मोदी-राहुल गांधी आमनेसामने

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडणार आहे. एकूण 71 जागांसाठी 1 हजार 66 उमेदवार रिंगणात आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदानासाठी नियमावली आखून दिली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज, दुसऱ्या टप्प्यातील प्रचारासाठी मोदी-राहुल गांधी आमनेसामने

पाटना: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 71 जागांसाठी हे मतदान होत आहे. जवळपास 2 कोटी मतदार आज 1 हजार 66 उमेदवारांचं भविष्य ठरवणार आहेत. दरम्यान, दुसऱ्या टप्प्याच्या प्रचार कार्यक्रमात आज पंतप्रधान मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी आमनेसामने येणार आहेत. पंतप्रधान दरभंगा, मुजफ्फरपूर आणि पाटन्यात रॅली करणार आहेत. तर राहुल गांधी वाल्मिकीनगर आणि कुशेश्वर इथं दोन रॅली काढणार आहेत. (today votiong for first phase election of Bihar assembly)

पहिल्या टप्प्यात अनेक दिग्गजांचं भवितव्य मशिनबंद होणार

पहिल्या टप्प्यात बिहारमधील अनेक दिग्गजांचं भवितव्य ठरणार आहे. त्यात बिहारचे कृषीमंत्री आणि भाजप नेते डॉ. प्रेम कुमार, कामगारमंत्री विजय कुमार सिन्हा, अनुसूचित जानी आणि जमाती कल्याण मंत्री बृजकिशोर बिंद, JDUचे नेते आणि बिहारचे शिक्षणमंत्री कृष्ण नंदन वर्मा, परिवहन मंत्री संतोष कुमार निराला, ग्रामीणविकास मंत्री शैलेश कुमार, विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री जय कुमार सिंह आमि राजस्व मंत्री रामनारायण मंडल यांच्या मतदारसंघाचा समावेश आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची खबरदारी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदानासाठी काही नियमावली जारी केली आहे. त्यानुसार एका मतदान केंद्रावर मतदारांची संख्या 1 हजार 600 वरुन 1 हजार करण्यात आली आहे. त्याचबरोबर 80 वर्षाहून अधिक वय असलेल्या मतदारांसाठी पोस्टल मतदानाची सोय करण्यात आली आहे. त्याचबरोबर वोटिंग मशीन सॅनिटाईझ करणं, मतदान कर्मचाऱ्यांसाठी मास्क, थर्मल स्कॅनर, हँड सॅनिटायझर, साबन आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

महायुती, आघाडी आणि लोकजनशक्तीमध्ये लढत

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप आणि JDU विरुद्ध काँग्रेस आणि RJD  असा सामना सुरु आहे. त्यात चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीनं अधिक रंगत भरली आहे. त्यामुळं बिहारमधील काही मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. दरम्यान, बिहार निवडणूक प्रचारात तेजस्वी यादव आणि चिराग पासवान यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना लक्ष्य केल्याचं पाहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या:

“आली-आली-आली, गेली-गेली-गेली”, भाजप अध्यक्षांकडून प्रचारात बिहारमधील लहानपणीचा किस्सा

बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 23 उमेदवार रिंगणात, कुणाचा फायदा आणि कुणाचा तोटा?

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचारतोफा आज थंडावणार, नड्डा, नितीशकुमार, तेजस्वी यादव यांचा रॅलीचा धडाका!

today votiong for first phase election of Bihar assembly

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *