AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेत मोर थुई थुई नाचले, बोलता बोलता थांबून शरद पवारही हसले!

दिल्लीत जिथे पत्रकार परिषद घेण्यात आली, त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नेत्यांपेक्षा मोरांचाच आवाज जास्त येत होता.

VIDEO : राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेत मोर थुई थुई नाचले, बोलता बोलता थांबून शरद पवारही हसले!
Sharad Pawar Delhi PC
| Updated on: Mar 16, 2021 | 7:34 PM
Share

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar PC at Delhi) यांनी राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. केरळमधील काँग्रेसचे माजी खासदार पी सी चाको (P. C. Chacko joins NCP) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पवारांच्या उपस्थितीत चाको यांनी घड्याळ हाती बांधलं. पी सी चाको हे काँग्रेसकडून तब्बल सातवेळा खासदार होते. या पक्षप्रवेश सोहळ्याला राष्ट्रवादीचे बडे नेते प्रफुल पटेल (Praful Patel) उपस्थित होते. (Peacocks voice at Sharad Pawar press conference Delhi during P. C. Chacko joins NCP)

ही पत्रकार परिषद गाजवली ती मोरांनी. दिल्लीत जिथे पत्रकार परिषद घेण्यात आली, त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नेत्यांपेक्षा मोरांचाच आवाज जास्त येत होता. या पत्रकार परिषदेची सुरुवात राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल पटेल यांनी केली. त्यांनी बोलायला सुरुवात करण्यापूर्वीच मोरांचे आवाज लक्ष वेधून घेत होते. मोरांचा आवाज इतका येत होता की, एकवेळ प्रफुल पटेल काय बोलत आहेत, हेच ऐकायला येत नव्हतं.

प्रफुल पटेल म्हणाले, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांच्या वतीने सर्वांचे स्वागत करतो. पटेल हे बोलत असतानाच मोरांचा आवाज जोरजोरात येत होता. त्यावेळी शरद पवारांनाही हसू आवरलं नाही, त्यांनी बोटाने इशारा करत, मोरांच्या आवाजाकडे उपस्थितांचं लक्ष वेधलं.

जोपर्यंत प्रफुल पटेल बोलत होते, तोपर्यंत मोरांचा आवाज सुरु होताच. त्यानंतर शरद पवार यांनी बोलायला सुरुवात केली. त्यावेळीही मोर मोठमोठ्याने ओरडू लागले. त्यावेळी शरद पवारांनी मोरांच्या आवाजाच्या दिशेने बोट करुन, उपस्थितांच्या मनात सुरु असलेली चुळबूळ आपल्यामार्फत व्यक्त केली.

VIDEO : शरद पवारांच्या पत्रकार परिषदेत मोरांचेच आवाज

(Peacocks voice at Sharad Pawar press conference Delhi during P. C. Chacko joins NCP)

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.