AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमरनाथ यात्रेसाठी आता या वयोगटातील लोकांना अर्ज करता येणार, सरकारने घेतला निर्णय

अमरनाथ यात्रा यंदा 1 जुलैपासून सुरू होणार असून ती 31 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. अत्यंत खडतर असलेल्या या यात्रेसाठी यंदा काही नविन नियमांचा आधार घेत नोंदणी प्रक्रीया सुरू झाली आहे, काय आहेत नियम पाहा...

अमरनाथ यात्रेसाठी आता या वयोगटातील लोकांना अर्ज करता येणार, सरकारने घेतला निर्णय
amarnath yatraImage Credit source: socialmedia
| Updated on: May 16, 2023 | 6:20 PM
Share

नवी दिल्ली : अत्यंत खडतर असलेल्या अमरनाथ यात्रेला ( Amarnath Yatra ) दरवर्षी हजारो भाविक जात असतात. परंतू आता या यात्रेसाठी 17 एप्रिलपासून नोंदणी सुरू करण्यात आली आहे. मात्र ही यात्रा अत्यंत प्रतिकूल वातावरणात होत असल्याने आता प्रवाशांच्या आरोग्याच्या काळजी पोटी केंद्र सरकारने ( central government ) आता नवीन नियमांची ( New Rule ) अट घातली आहे. आता नव्या नियमानूसार 13 वर्षांपेक्षा कमी आणि 75 वर्षांच्या पुढील व्यक्तींना मनाई करण्यात आली आहे. आणखीन देखील काही नियम घातले आहेत ते खालील प्रमाणे आहेत. पाहा काय आहेत नियम आणि यात्रेची तयारी…

हे आहे वयाचे बंधन

अमरनाथ यात्रा यंदा 1 जुलैपासून सुरू होणार असून ती 31 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या यात्रेसाठीची नोंदणी देशभरातील मान्यताप्राप्त बॅंकांच्या शाखांमधून सुरू करण्यात आली आहे. देशभरातील लोक या यात्रेचे परमिट मिळण्यासाठी नावाची नोंदणी करीत आहेत. दक्षिण काश्मीरातील 3,880 मीटर उंचीवर असलेल्या बाबा बर्फानीच्या गुहेत दर्शनासाठी 62 दिवस पायी प्रवास करावा लागत असतो.

सहा महिन्यांच्या गर्भवतींना मनाई

ही यात्रा अत्यंत खडतर असल्याने सरकारने यंदा नविन नियम बनविले आहेत. तेरा वर्षांपेक्षा लहान आणि पंच्याहत्तरपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी ही यात्रा करू नये तसे नियमच तयार केले आहेत. तसेच सहा महिन्यांपेक्षा जास्त काळाच्या गर्भवती महिलांना देखील मनाई करण्यात आली आहे. त्यांचे रजिस्ट्रेशन होणारच नाही.

आरोग्याचे प्रमाणपत्र 

बाबा अमरनाथ यात्रेसाठी दोन रस्त्यांनी जाण्याची सोय आहे. पहीला मार्ग दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथून 48 किलोमीटरचा आहे. तर दुसरा मार्ग मध्य काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यातून 14 किलोमीटरचा असला तरी उभी चढण असलेला बालटाल मार्ग असून तो अत्यंत अवघड मानला जातो. यात्रेकरीता गेल्यावर्षी मॅन्युअल प्रक्रिया होती. आता आधारकार्ड प्रमाणीकरणासह ऑनलाईन जनरेट सिस्टीम तयार केली आहे. सर्व इच्छुकांना देभभरातील नियुक्त केलेल्या डॉक्टरांकडून आरोग्याचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे.

अडीच हजार शौचालये

जम्मू – कश्मीर पोलीसांनी अमरनाथ यात्रेसाठी तयारीचा आढावा घेतला आहे. सीआरपीएफ, पोलीस, गुप्तचर विभागाशी समन्वय सुरू आहे. अमरनाथ यात्रेसाठी अडीच हजार शौचालये तयार करण्याची योजना आखण्यात आली आहे. यापेक्षा बहुतांश शौचालये 3,880 मीटर उंचीवर असलेल्या पवित्र गुहेकडे जाणाऱ्या मार्गांवर उभारण्यात येतील. लखनपूर पासून गुहेपर्यंत त्यासाठी 1500 मजूरांची तैनाती केली जाईल असे सूत्रांनी सांगितले.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.