AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठा दणका! पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, ज्याची भीती तेच घडले, तब्बल..

Petrol Diesel price hike : पाच दिवसांपूर्वीच पेट्रोल आणि डिझेल किमतीमध्ये वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा मोठा दणका सरकारकडून नागरिकांना देण्यात आला. देशभरात पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली.

मोठा दणका! पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, ज्याची भीती तेच घडले, तब्बल..
Petrol Diesel price hike
| Updated on: May 19, 2026 | 7:22 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धाचा भारतावर परिणाम होत आहे. महागाईमध्ये वाढ झाली. हेच नाही तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होतंय. पाच दिवसांपूर्वीच पेट्रोल 3 रूपयांनी तर डिझेलही 3 रूपयांनी वाढवण्यात आले. होर्मुज खाडी बंद असल्याने कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण झाला. काही देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेल पूर्णपणे संपल्याने थेट लॉकडाऊनची स्थिती आहे. जागतिक बाजारात सतत कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ होतंय. ऊर्जेचे मोठे संकट आहे. इराण आणि अमेरिका युद्धाचा फटका जगाला बसत आहे. केंद्र सरकार मागील आठ दिवसांपासून मोठे निर्णय घेताना दिसतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला पुढील 1 वर्षाकरिता सोने न खरेदी करण्याचे आवाहन केले. यासोबतच विदेश प्रवास आणि पेट्रोल आणि डिझेलच्या कमी वापराबद्दल आवाहन केले. यानंतर त्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ केली.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ करून 5 दिवस होत नाहीत तोवरच आता पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ करण्यात आली. पाच दिवसातच ही वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे. देशभरात पेट्रोलचे दर 86 पैशांनी तर डिझेलचे दर 83 पैशांनी वाढले आहेत. चार वर्षात सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रणात ठेवत वाढ केली नव्हती.

इराण आणि अमेरिका युद्धाचा जोरदार फटका बसत आहे. पाच दिवसांमध्ये पुन्हा दरामध्ये वाढ करण्यात आली. यासोबतच सोने आणि चांदीबद्दलही सरकारने मोठा निर्णय घेतला. महागाईचा मोठा झटका जनतेला बसत आहे. सतत महागाई वाढत आहे. सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या दरांमुळे पैशांचे गणित फिसकटताना दिसत आहे.

इराण आणि अमेरिका युद्ध पुढील काही दिवस असेच सुरू राहिले तर याचा मोठा फटका बसू शकतो. पुढील काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात यापेक्षाही जास्त वाढ होण्याचे संकेत आहेत. होर्मुज खाडीत मोठ्या प्रमाणात तणाव असल्याने जहाज अडकले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या एकीकडे तुटवडा तर दुसरीकडे त्याच्या दरात सतत वाढ होत आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...