‘ती’ IAS अधिकारी, लाच घेतल्याच्या आरोपाखाली जेलची हवा, लग्नासाठी जामिन मिळाला तर थेट जजसोबतच सात फेरे, वाचा सविस्तर

पिंकी मीणा यांचं लग्न राजस्थानमधील न्यायाधीश नरेंद्र कुमार यांच्याशी झालं आहे. लग्नानंतर पिंकी आपल्या सासरी बसवा इथं गेल्या आहेत.

'ती' IAS अधिकारी, लाच घेतल्याच्या आरोपाखाली जेलची हवा, लग्नासाठी जामिन मिळाला तर थेट जजसोबतच सात फेरे, वाचा सविस्तर

नवी दिल्ली : लाच प्रकरणात निलंबित झालेल्या सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट अर्थात SDM पिंकी मीणा 16 फेब्रुवारीला लग्नाच्या बेडीत अडकल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे पिंकी मीणा यांचं लग्न ठरलेल्या ठिकाणी झालंच नाही. लग्न सोहळ्याचा हॉल होता तिथे सगळी पाहणे मंडळी जमली होती. तेव्हा कळालं की वरात इथं येणारच नाही. त्यामुळे तिथं उपस्थित असलेला प्रत्येक माणूस हैराण झाला. मात्र, नंतर कळालं की माध्यमांपासून वाचण्यासाठी हा प्लॅन बनवण्यात आला होता. पिंकी मीणा यांचं लग्न त्यांच्या राहत्या घरीच साधेपणानं पार पडलं.(Pinky Meena, an officer involved in a bribery case, marries a judge)

न्यायाधीशासोबत लग्नाचे सात फेरे

पिंकी मीणा यांचं लग्न राजस्थानमधील न्यायाधीश नरेंद्र कुमार यांच्याशी झालं आहे. लग्नानंतर पिंकी आपल्या सासरी बसवा इथं गेल्या आहेत. लग्नानंतर पिंकी आणि त्यांच्या पतीचे काही फोटोही व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये पिंकी लग्नाचे विधी पार पाडताना दिसत आहेत. यासह अनेक पिंकी यांच्या लग्नाचे अनेक फोटो व्हायरल होत आहे.

रविवारी पुन्हा कोठडीत रवानगी

भ्रष्टाचार प्रकरणात कारागृहात असलेल्या पिंकी मीणा यांना लग्नासाठी राजस्थान उच्च न्यायालयानं 10 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. लग्नानंतर 21 फेब्रुवारीला पिंकी यांना पुन्हा सरेंडर करायचं आहे. त्यामुळे जामीनावर बाहेर आल्यानंतर 11 फेब्रुवारीला पिंकी यांची ‘चावल कि रस्म’ आणि 12 फेब्रुवारीला ‘बान सांकडी रस्म’ पार पडली. दरम्यान, पिंकी मीणासह उपखंड अधिकारी पुष्कर मित्तलला 13 फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती. तसंच तपासानंतर दौसाचे पोलीस अधीक्षक मनीष अग्रवाल आणि त्यांच्यासाठी दलाली करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली होती.

लग्न पत्रिकेवर सामाजिक संदेश

व्हॅलेंटाईन दिवशीही पिंकी यांच्या लग्नाचा एक महत्वाचा विधी पार पडला. तत्पूर्वी पिंकी यांच्या लग्नपत्रिकेच्याही अनेक बातम्या झाल्या होत्या. त्या लग्नपत्रिकेत कोरोनाबाबत जनजागृती आणि अन्न वाटोळं न करण्यााबाबत सामाजिक संदेश देण्यात आला होता. ‘दो गज की दूरी मास्क है जरुरी’, ‘उतना ही ले थाली में, व्यर्थ न जाए नाली में’, असा संदेश या लग्नपत्रिकेवर लिहिण्यात आला होता.

10 लाखाची लाच घेताना चतूर्भुज

पिंकी मीणा यांना दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे तयार करण्याच्या कामातील कॉन्ट्रॅक्टरकडून 10 लाख रुपयांची लाच घेताना रंगे हात पकडलं होतं. त्यानंतर त्यांना अटक करुन त्यांची रवानगी जेलमध्ये करण्यात आली होती.

इतर बातम्या :

VIDEO: पंतप्रधान मोदींची मिमिक्री करणं पुन्हा महागात, कॉमेडियन श्याम रंगीला विरोधात तक्रार दाखल

दिशा रवीसाठी ग्रेटा थनबर्ग मैदानात; ट्विट करून मानवाधिकाराच्या मुद्द्यावरून टीका

Pinky Meena, an officer involved in a bribery case, marries a judge

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI