AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lakshadweep Tourism | लक्षद्वीपमध्ये एकच एअरपोर्ट पण तो किती खतरनाक आहे, त्यासाठी हा VIDEO बघा

Lakshadweep Tourism | कदाचित तुम्हाला माहित नसेल, लक्षद्वीपमध्ये एकच एअरपोर्ट आहे, अगाती बेटावर हा एअरपोर्ट आहे. त्यामुळे अगाती एअरपोर्टच्या नावाने हा विमानतळ ओळखला जातो. या एअरपोर्टचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पाहताना काही जणांना थरारकतेचा अनुभव येत आहे.

Lakshadweep Tourism | लक्षद्वीपमध्ये एकच एअरपोर्ट पण तो किती खतरनाक आहे, त्यासाठी हा VIDEO बघा
lakshadweep airport
| Updated on: Jan 09, 2024 | 11:04 AM
Share

Lakshadweep Tourism | भारताच्या लक्षद्वीपची सध्या सगळ्या जगात चर्चा सुरु आहे. नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अद्भुत आणि सुंदर बेटाचा दौरा केला. त्याचे सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यानंतर अनेकांनी लक्षद्वीपच्या सौंदर्याच कौतुक केलं. सुट्टयांमध्ये मालदीवपेक्षाही ही चांगली जागा असल्याच म्हटलं. मोदींच्या लक्षद्वीप भेटीनंतर मालदीवच्या मंत्र्यांनी वादग्रस्त टिप्पणी केली आणि एकच वाद सुरु झाला. सोशल मीडियावर अनेकांनी लक्षद्वीपच्या सौंदर्याच कौतुक करत मालदीवच बुकिंग रद्द केलं. लक्षद्वीप फिरण्याचे प्लान बनवले. पण तुम्हाला एक गोष्ट माहितीय का? लक्षद्वीपमध्ये एकच एअरपोर्ट आहे, तो सुद्धा इतका खतरनाक आहे की, अनेकदा पायलटच लँडिंगच्यावेळी टेन्शमध्ये येतात.

लक्षद्वीपचा हा एकमेव एअरपोर्ट अगाती बेटावर आहे. हा अगाती एअरपोर्ट म्हणून ओळखला जातो. हा एअरपोर्ट 1204 मीटर लांब असून 30 मीटर रुंद आहे. चारही बाजूला समुद्राचे पाणी आहे. त्यामुळेच अनेकदा प्लेन उतरवण्यात आणि टेकऑफ करताना वैमानिकांची हालत खराब होते. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यात एअरपोर्टवर प्लेन लँड होताना दिसतय. लँडिंगचा अनुभव खतरनाक असला, तरी आकाशातून एअरपोर्टच दृश्य किती सुंदर आहे? ते या व्हिडिओमध्ये दिसतं.

किती लाख लोकांनी व्हिडिओ पाहिला?

प्लेन लँडिंगचा हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टि्वटरवर @RaushanRRajput नावाच्या आयडीवरुन शेअर करण्यात आलाय. अवघ्या 27 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 75 लाखापेक्षा पण अधिकवेळा पाहण्यात आलाय. 98 हजारपेक्षा अधिक लोकांनी व्हिडिओ लाइक केलाय.

‘ही जागा एक स्वर्ग आहे’

व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका पाकिस्तानी युजर्सनी लिहिलय की, “ही जागा एक स्वर्ग आहे. भारतीय प्रशासन प्रोत्साहन देण्यासाठी चांगल्या पद्धतीने काम करतय” दुसऱ्या एका युजरने लिहिलय की, “लवकरात लवकर याला जागतिक विमानतळामध्ये बदलण्याची गरज आहे”

तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.