PM Modi: आता ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात PM मोदींचा मास्टरस्ट्रोक, GST मुळे सगळंच बदलणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी जीएसटीचे नवे दर उद्यापासून लागू होणार असल्याचे जाहीर केले. यामुळे दररोजच्या जीवनातील अनेक गोष्टी स्वस्त होणार आहेत. यामुळे अमेरिकेच्या टॅरिफचा प्रभावही कमी होणार आहे.

PM Modi: आता ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात PM मोदींचा मास्टरस्ट्रोक, GST मुळे सगळंच बदलणार?
modi and trump gst
| Updated on: Sep 21, 2025 | 8:02 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी जीएसटीचे नवे दर उद्यापासून लागू होणार असल्याचे जाहीर केले. यामुळे दररोजच्या जीवनातील अनेक गोष्टी स्वस्त होणार आहेत. याचा फायदा देशातील व्यापाऱ्यांना होणार आहे. यावेळी पंतप्रधानांनी स्वदेशीच्या वापरावर आणि आत्मनिर्भर भारत बनवण्यावर भर दिला. देशात आता फक्त 5 आणि 18 टक्के टॅक्स स्लॅब असणार आहे. पंतप्रधान मोदींच्या या घोषणेमुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णयावर नक्कीच परिणाम होणार आहे.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या भाषणाच्या सुरुवातीला देशवासियांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “22 सप्टेंबर हा नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि याच दिवशी नवीन जीएसटी लागू दर लागू केले जाणार आहेत. त्यामुळे हा केवळ उत्सव साजरा करण्याचा नव्हे तर आर्थिक विकास आणि कर सुधारणांसाठी एक महत्त्वाचा काळ आहे. या निर्णयामुळे प्रत्येक नागरिकाचे पैसे वाचतील. जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. यामुळे प्रत्येक घरात आनंद पसरेल. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. आता ‘एक राष्ट्र, एक कर’ चे स्वप्न पूर्ण होत आहे.”

99% वस्तूंवर आता केवळ 5 % जीएसटी आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे बोलताना सांगितले की, “99 % वस्तूंवर आता केवळ 5 % जीएसटी आहे. यामुळे मध्यमवर्गाचे जीवन बदलणार आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा होत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे अनेकांची स्वप्ने पूर्ण होणार आहेत. आपण फक्त भारतात बनवलेल्या वस्तूच खरेदी कराव्यात. लोकांनी अभिमानाने म्हणावे की, “मी मेड इन इंडिया सामान खरेदी करत आहे.” याचा फायदा लहान व्यवसायांना होईल.

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटले की, ‘2014 मध्ये जेव्हा मी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा मी एका परदेशी वृत्तपत्रात एक अहवाल वाचला होता. त्यात असे लिहिले होते की, बेंगळुरूहून हैदराबादला माल पाठवणे कंपनीसाठी इतके कठीण होते की, ते प्रथम युरोपला माल पाठवायचे आणि नंतर युरोपमधून हैदराबादला आयात करायचे. त्यावेळी ही परिस्थिती होती. लाखो कंपन्यांना अशाच प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागले.’

कोणत्या वृत्तपत्राचा उल्लेख?

पंतप्रधान मोदी यांनी लेस इकोस या फ्रेंच वृत्तपत्राचा उल्लेख केल आहे. यानुसार, एका फ्रेंच तंत्रज्ञान कंपनीला बेंगळुरूहून हैदराबादला म्हणजे 570 किमी अंतरावर माल पाठवणे लॉजिस्टिक्स रचनेतील गुंतागुंतीमुळे खर्चिक होते. ही कंपनी प्रथम युरोपला माल पाठवायची आणि नंतर युरोपमधून हैदराबादला परत आयात करायची. कापड उद्योगाचा आणि इतर उप्तादनांचा वाहतूक खर्च आणि कर इतका जास्त होता की, तो कधीकधी उत्पादनाच्या किमतीपेक्षा जास्त असायचा. हा खर्च टाळण्यासाठी कंपन्या आधी माल परदेशात पाठवायच्या आणि पुन्हा आयात करत होत्या. मात्र आता जीएसटीमुळे कंपन्यांना अशाप्रकारच्या त्रासाला सामना करावा लागत नाही.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच काय होणार?

अमेरिकेने भारतावर 50 टक्के कर लादला आहे. यामुळे अमेरिकेत जाणाऱ्या भारतीय वस्तू महाग झाल्या आहेत. त्यामुळे भारतीय व्यापाऱ्यांची कोंडी होण्याची शक्यता होती. मात्र आता भारत सरकारने जीएसटीमध्ये बदल केल्यामुळे व्यापारी, उद्योजक आणि सामान्य नागरिकांना फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता भारतात निर्माण झालेल्या वस्तूंचा स्वदेशी बाजारपेढेतच खप वाढू शकतो. दुसरीकडे यामुळे भारतीय लोकांना कमी दरात वस्तू मिळू शकणार आहेत. त्यामुळे टॅरिफच्या एकाप्रकारे दहशत कमी होण्याची शक्यताही या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.