AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदीजी है तो मुमकिन है; आता काहीही झालं तरी या गावात वीज कधी जाणारच नाही

गुजरातमध्ये वीज, पाणी आणि रस्ते-रेल्वेसारख्या प्रकल्पापासून ते अगदी दुग्धव्यवसायापर्यंत अशा विविध प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले आहे.

मोदीजी है तो मुमकिन है; आता काहीही झालं तरी या गावात वीज कधी जाणारच नाही
| Updated on: Oct 09, 2022 | 7:43 PM
Share

अहमदाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज गुजरातमधील मोढेरा, मेहसाणा या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली. यादरम्यान त्यांनी मोढेरा गावाला भारतातील पहिले 24 तास, 7 दिवसांचे सौरऊर्जेचे गाव (Solar Village) म्हणूनही घोषित करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलताना सांगितले की, आज मोढेरासाठी मेहसाणा आणि उत्तर गुजरातसाठी ही विकासाची एक नवी ऊर्जा प्राप्त झाली आहे.

वीज, पाणी आणि रस्ते-रेल्वेसारख्या प्रकल्पापासून ते अगदी दुग्धव्यवसायापर्यंत अशा विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली आहे.

गुजरातमधील या प्रकल्पांमुळे रोजगाराच्या अनेक नवीन संधी येथे निर्माण होणार असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

यामुळे शेतकरी आणि पशुपालकांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. विविध प्रकल्पांची कामं सुरू झाल्याने या संपूर्ण प्रदेशात पर्यटनातील सुविधांचाही विस्तार होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मोढेरातील विविध विकास कामांची पायाभरणी केल्या नंतर नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, या प्रकल्पाची गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र चर्चा सुरू होती. त्यामुळे आता ही स्वप्नं सत्यात उतरत असल्याने आनंद होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विकासात्मक प्रकल्पामुळे आमच्या सरकारच्या विश्वासाचा आणि तंत्रज्ञानाचा एकत्र संगम झाल्याच येथे पाहायला मिळत आहे.

मोढेरातील आता अनेक गोष्टी या आधुनिकतेसाठी नवा आदर्श असतील असंही त्यांनी सांगितले. भविष्यात जेव्हा जेव्हा सौरऊर्जेबाबत कुठेही चर्चा होईल तेव्हा मोढेराचे नाव सर्वप्रथम घेतले जाईल, असे ते म्हणाले.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...