इटलीच्या पंतप्रधान मेलोनीच्या व्हायरल रिलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कॉमेंट, एक्सवर स्पेशल मेसेज…

PM Modi And Meloni Video: नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचा हा पहिला विदेश दौरा आहे. या दौऱ्यात त्यांनी जी-7 शिखर परिषदेत सहभाग घेतला. जगभरातून आलेल्या मोठ्या नेत्यांच्या भेटी झाल्या. इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्यावर भारताची छाप दिसून आली.

इटलीच्या पंतप्रधान मेलोनीच्या व्हायरल रिलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कॉमेंट, एक्सवर स्पेशल मेसेज...
narendra modi and million
Follow us
| Updated on: Jun 16, 2024 | 9:42 AM

PM Modi And Meloni Video: पंतप्रधान नरेंद्र मोदी G-7 परिषेदसाठी इटलीच्या दौऱ्यावर आहेत. त्या दौऱ्यात इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबतचा एक सेल्फी व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये दोन्ही नेते हसत हसत कॅमेऱ्याकडे हात हलवताना दिसत आहे. या व्हिडिओवर अनेक यूजर्सकडून प्रतिक्रिया येत आहेत. हा व्हिडिओ चांगला व्हायरल झाला आहे. आता त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर तो व्हिडिओ रिपोस्ट करत लिहिले आहे की, ‘भारत-इटली मैत्रीपूर्ण संबंध नेहमी कायम राहणार आहे.’ नरेंद्र मोदी यांनी या मेसेजसोबत दोन्ही देशांचा झेंडाही लावला आहे.

पंतप्रधान मेलोनी यांच्यावर भारताची छाप

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचा हा पहिला विदेश दौरा आहे. या दौऱ्यात त्यांनी जी-7 शिखर परिषदेत सहभाग घेतला. जगभरातून आलेल्या मोठ्या नेत्यांच्या भेटी झाल्या. इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्यावर भारताची छाप दिसून आली. त्यांनी परिषदेत आलेल्या जगभरातील सर्व नेत्यांचे स्वागत नमस्ते…करत केले.

हे सुद्धा वाचा

नरेंद्र मोदी यांनी मानले आभार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीतील लोकांचे आणि तेथील सरकारचे उत्कृष्ट आदरातिथ्य केल्याबद्दल आभार मानले. ते म्हणाले, महत्त्वाच्या G7 परिषदेत मी सहभागी झालो. त्या ठिकाणी मी जागतिक नेत्यांसमोर भारताचा दृष्टीकोन मांडला. या पोस्टसोबत त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याच्या प्रवासाची झलक पाहायला मिळते.

दोन्ही नेत्यांसंदर्भात अशी केमिस्ट्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इटली दौरा चांगला चर्चेत राहिला आहे. नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी राजकारणात शुन्यातून सुरुवात केली. त्यानंतर दोन्ही नेते देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचले आहेत. हे दोन्ही नेते आपल्या देशात प्रचंड लोकप्रिय आहेत. G-7 शिखर परिषदेत भारताला यंपाहुणे देश म्हणून आमंत्रित केले आहे. कारण भारत G-7 चा सदस्य नाही. G-7 मध्ये अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, जपान आणि युरोपियन युनियन आहे.

Non Stop LIVE Update
'अमित शाह यांची पवारांवरील टिका...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'अमित शाह यांची पवारांवरील टिका...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
जगबुडी नदीच्या पुलाला तडा गेला, टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर लेन बंद
जगबुडी नदीच्या पुलाला तडा गेला, टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर लेन बंद.
'मैं बनिए का बेटा हू गॅरंटीशिवाय...., ' काय म्हणाले अमित शाह
'मैं बनिए का बेटा हू गॅरंटीशिवाय...., ' काय म्हणाले अमित शाह.
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाह यांनी जहरी टिका
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाह यांनी जहरी टिका.
स्वत: चं पाप दुसऱ्यावर टाकणं हीच भाजपाची मानसिकता - नाना पटोले
स्वत: चं पाप दुसऱ्यावर टाकणं हीच भाजपाची मानसिकता - नाना पटोले.
चंद्रपूरातील चिचपल्ली गावात गाव तलाव फुटल्याने 100 ते 150 घरांत पाणी
चंद्रपूरातील चिचपल्ली गावात गाव तलाव फुटल्याने 100 ते 150 घरांत पाणी.
'मी शरद पवार यांचा अपमान करुच..,' काय म्हणाले अजितदादा पवार
'मी शरद पवार यांचा अपमान करुच..,' काय म्हणाले अजितदादा पवार.
घाटकोपर भटवाडी कातोडीपाडा भागात दरड कोसळली, घरांचे मोठे नुकसान
घाटकोपर भटवाडी कातोडीपाडा भागात दरड कोसळली, घरांचे मोठे नुकसान.
'गुलाबी स्वप्नं दादांनी आधीच...,' काय म्हणाल्या रुपाली चाकणकर
'गुलाबी स्वप्नं दादांनी आधीच...,' काय म्हणाल्या रुपाली चाकणकर.
'तर मी आणि दरेकर राजीनामा द्यायला तयार,पण जरांगे यांनी..,' प्रसाद लाड
'तर मी आणि दरेकर राजीनामा द्यायला तयार,पण जरांगे यांनी..,' प्रसाद लाड.