Mann Ki Baat: सत्तेत नव्हे, सेवेत राहायचं आहे, मोदींची देशवासियांशी ‘मन की बात’

मला सत्तेत नाही तर सेवेत राहायचं आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मनातील भावना देशावासियांशी बोलून दाखवल्या.

Mann Ki Baat: सत्तेत नव्हे, सेवेत राहायचं आहे, मोदींची देशवासियांशी 'मन की बात'
Prime Minister Narendra Modi

नवी दिल्ली: मला सत्तेत नाही तर सेवेत राहायचं आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मनातील भावना देशावासियांशी बोलून दाखवल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बातमधून देशावासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही भावना व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या मन की बातमधून विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, वृदांवन धामची भव्यता, पर्यावरण आदी मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं. यावेळी आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळालेल्या राजेश कुमार प्रजापती नावाच्या व्यक्तीशी मोदींनी संवाद साधला. त्याचं आजारपण, त्याला मिळालेली मदत आदी मुद्द्यांवर मोदींनी प्रजापतीशी संवाद साधला. तसेच इतरांनाही या योजनेची माहिती देण्याचे आवाहन मोदींनी त्याला केलं. त्यावेळी प्रजापती यांनी मोदींच्या दीर्घायुष्याची कामना केली. तुम्ही सत्तेत रहोत अशी भावनाही त्याने व्यक्त केली. त्यावेळी मी आता सत्तेत असल्याचं मानत नाही. सत्ता ही सेवेसाठी असते. मी आज पण सत्तेत नाही, भविष्यातही सत्तेत जाऊ नये, अशी माझी भावना आहे. मी सत्तेऐवजी सेवेला महत्त्व देतो, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

पर्थमध्ये वृंदावन

ऑस्ट्रेलियात पर्थ नावाचं शहर आहे. या शहराबद्दल आपल्या क्रिकेटपटूंना आणि क्रिकेटप्रेमींना अधिक माहिती असेल. कारण या ठिकाणी नेहमी क्रिकेटचे सामने होतात. पर्थमध्ये सेक्रेड इंडियन गॅलरी आहे. ती ऑस्ट्रेलियातील रहिवासी जगतारिणी यांच्या मालकीची आहे. त्या जगतारिणी यांनी वृंदावन येथे येऊन 13 वर्ष वास्तव्य केलं. वृदांवनशी त्यांचं नातं जुळलं होतं. जगतारिणी यांनी ऑस्ट्रेलियात वृदांवन निर्माण केलं, असं त्यांनी सांगितलं.

आदिवासींचं स्वातंत्र्य लढ्यात योगदान

यावेळी त्यांनी आदिवासी समाजाचं स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, हिमाचल प्रदेशमधील कार्यक्रम, राणी दुर्गावतीचं योगदान याचं स्मरण मन की बातच्या माध्यमातून केलं. मन की बातच्या माध्यमातून देशभक्तीपर गीतं लेखन, रांगोळी लेखन या सारख्या स्पर्धांचं आयोजन करण्यात यावे. भारतातील सर्व कानाकोपऱ्यात या योजनेला आपण पुढे घेऊन जाईल, अशी आशा आहे, असं ते म्हणाले. सीतापूरच्या एका विद्यार्थिनीनं स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवामुळं फायदा झाल्याचं लिहिलं. अमृत महोत्सव आपल्याला देशासाठी काही तरी करण्याची प्रेरणा देते. आझादी की कहाणी बच्चो की जुबानी या कार्यक्रमात विदयार्थ्यांनी नेपाळ, मॉरिशस आणि फिजीचे विद्यार्थी देखील सहभागी झाले. देशाची महारत्न कंपनी ओएनजीसी वेगळ्या प्रकारे स्वांतंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

Pm modi : हिवाळी अधिवेशनाच्या आधी मोदींनी बोलवली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, या मुद्द्यावर होणार बैठकीत चर्चा…

Maharashtra News LIVE Update | असंख्य वेदना जनतेला भोगाव्या लागत आहेत त्याचे सरकारला काही देणेघेण आहे का?: आशिष शेलार

चंद्रकांतदादांना हटवायचं की फडणवीसांना हटवायचं?, भाजपमध्ये खदखद, घरवापसीचा कार्यक्रम लवकरच; नवाब मलिकांचा दावा

Published On - 12:32 pm, Sun, 28 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI