पीएम मोदी यांचे पुन्हा एकदा गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव दाखल, ‘परीक्षा पे चर्चा’ने केला अनोखा विक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव पुन्हा एकदा गिनिज बुकात गेले आहे. यावेळी शिक्षण क्षेत्रातील अनोख्या "परीक्षा पे चर्चा" कार्यक्रमांतर्गत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्सचे प्रमाणपत्र त्यांना मिळाले आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुन्हा एकदा गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव दाखल झाले आहे. पुन्हा एका धर्मेंद्र प्रधान यांच्या नेतृत्वाखालील मंत्रालयाच्या संदर्भातील मोहिमेद्वारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. हे दुसऱ्यांदा घडले आहे की धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गिनिज बुकचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
“परीक्षा पे चर्चा” या उपक्रमाला एका महिन्यात सर्वाधिक रजिस्ट्रेशन प्राप्त करणारा नागरिकांच्या सहभागाचा प्लॅटफॉर्म म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान देण्यात आले आहे. हा कार्यक्रम ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी परीक्षेच्या आधी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतात. देशभरातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग घेत असतात. या कार्यक्रमामुळे केवळ परीक्षेचा केवल तणावच कमी होत नाही तर पंतप्रधानांच्या वक्तव्याने विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळत असते. त्यामुळे यात सहभागी विद्यार्थ्यांसाठी हा एक उत्सावाचा सोहळाच असतो.
या आधी साल २०१५ मध्ये जेव्हा धर्मेंद्र प्रधान पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री होते, तेव्हा ‘पहल’ ( एलपीजीसाठी थेट लाभ हस्तांतरण ) योजने अंतर्गत १२.५७ कोटी कुटुंबांना रोख हस्तांतरण प्रदान योजनेला जगातील सर्वात मोठा रोख हस्तांतरण कार्यक्रम म्हणून मान्यता देण्यात आली होती.
आतापर्यंत मोदी सरकारच्या चार उपक्रमांना गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सद्वारा मान्यता मिळालेली आहे. यातील दोन उपक्रम केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या नेतृत्वाखाली कार्यान्वित झाल्या होत्या. या शिवाय आंतरराष्ट्रीय योग दिवस ( २०१५ ) आणि पंतप्रधान जन धन योजनेला देखील गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळाले आहे.
धर्मेंद्र प्रधान सरकारच्या व्हीजनला पुढे नेत आहेत
मोदी सरकारमध्ये एक असेही मंत्री आहेत जे कोणत्याही प्रसिद्धीविना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्स मध्ये नाव नोंदवत आहेत. हे आहेत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान. ज्यांनी अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना “परीक्षा पे चर्चा” कार्यक्रमांतर्गत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्सचे प्रमाणपत्र सोपवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू धर्मेंद्र प्रधान नेहमीच लो प्रोफाईल राहून सतत सरकारच्या व्हीजनला पुढे नेत आहेत.
