PM Modi Birthday : पंतप्रधान मोदींच्या सेवाभावाचा सन्मान; भाजपचे आजपासून सेवा पर्व
PM Modi turn @ 75 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. आज ते 75 व्या वर्षांत दाखल झाले. तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज भाजपकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज 75 व्या वर्षात प्रवेश केला आहे. तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. त्यांच्या कार्यकाळात भारताने आर्थिक आघाडीवर मोठी झेप घेतली आहे. भारत आता लवकरच जागतिक तिसरी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे. त्यांचे राष्ट्र निर्मिती आणि विकासातील योगदान आणि सेवा भावाचा सन्मान करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने 15 दिवसांचे विशेष अभियान ‘सेवा पर्व 2025’ ची सुरुवात केली आहे. हा कार्यक्रम 2 ऑक्टोबरपर्यंत चालेल. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सेवा भावना आणि त्यांचे समर्पण यांचा सन्मान करण्यात येईल.
सेवा पर्व 2025 चा उद्देश नागरिकांना सेवा कार्यांमध्ये सहभागी करण्यासाठी प्रेरणा देणे हे आहे. “सेवा ही संकल्प, राष्ट्र सर्वोपरि” या पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शन मंत्राच्या प्रेरणेतून सेवा पर्व हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान नमो ॲपच्या (NaMo App) माध्यमातून संवादात्मक आणि प्रेरणात्मक अनुभवावर आधारीत आहे. त्याआधारे त्यात विशेष बदल करण्यात आले आहेत.
या अभियानात काय काय होणार?
1. सर्वांची साथ, सर्वांची सेवा
या श्रेणीतंर्गत नागरिकांना ‘आईच्या नावे एक वृक्ष’ या संकल्पासह एक झाड लावणे, रक्तदान करणे, स्वच्छ भारत अभियानासारख्या 15 पूर्व निर्धारीत सेवांमध्ये सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येईल. हा उपक्रम राबविल्यानंतर नागरिकांना, कार्यकर्त्यांना त्याचे फोटो NaMo App वर सेल्फी अपलोड करता येईल. सर्वात सक्रिय कार्यकर्त्यांचे, नागरिकांचे फोटो लीडरबोर्डावर झळकतील. त्यांना वैयक्तिक प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल.
2. व्हर्च्युअल एक्झिबिशन (Virtual Exhibition)
येथे लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीवनपट अगदी जवळून पाहता येईल. त्यांना मोदींचा आतापर्यंतचा प्रवास पाहता येईल. यामध्ये “मोदी माईलस्टोन फोटोबूथ” आणि “Journey of Narendra Modi” या लिंकच्या आधारे त्यांच्या लहानपणापासून ते आतापर्यंतची प्रेरणात्मक यात्रेची झलक पाहायला मिळेल.
3. AI शुभेच्छा रील (AI Wishes Reel)
येथे लोक कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) मदतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या आवडीप्रमाणे वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकतील.
4. डिस्कव्हर योर मोदी ट्रेट (Discover Your Modi Trait)
तुमच्यात मोदींचे कोणते गुण आहेत, त्यांच्या व्यक्तिगत गुणातील कोणती झलक तुमच्यात आहे, याचे विश्लेषण नागरिकांना करता येईल.
5. Know Your NaMo Quiz
ही प्रश्नोत्तर स्पर्धा आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयीचे 10 प्रश्न विचारण्यात येतील. स्पर्धकांना त्यांची अचूक उत्तरं द्यावी लागतील.
