AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“पीएम मोदींचे 10 सलग फोन, पण मी उचललेच नाही” नवनिर्वाचित राज्यपालाने का केले असे… सांगितला तो किस्सा

PM Narendra Modi: भारतीय जनता पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याची नुकतीच ओडिशाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. त्यांना पीएम मोदींनी 10 वेळा सलग फोन केला. पण त्यांनी तो उचलला नाही. काय आहे त्यामागील रंजक हिस्सा?

पीएम मोदींचे 10 सलग फोन, पण मी उचललेच नाही नवनिर्वाचित राज्यपालाने का केले असे... सांगितला तो किस्सा
पीएम मोदींनी 10 वेळा सलग फोन केला. पण त्यांनी तो उचलला नाही. राज्यापालांनी सांगितला त्यामागील रंजक हिस्सा
| Updated on: Oct 14, 2026 | 11:26 AM
Share

झारखंडमधील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पलामूचे माजी खासदार ब्रजमोहन राम यांची नुकतीच ओडिशाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. या नियुक्तीनंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना एक रंजक किस्सा सांगितला. राज्यपाल पदी त्यांची नियुक्ती होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना स्वत:हून संपर्क साधला. एकदा, दोनदा नाही तर त्यांनी 10 वेळा आपल्याला सलग फोन केला. पण त्यांचा संपर्क क्रमांक मोबाईलमध्ये सेव्ह, जतन न केल्याने या अनोळखी कॉलकडे त्यांनी दुर्लक्ष केले. त्यांना पंतप्रधान कॉल करत होते, पण त्यांनी काही फोन उचलला नाही, असा खुलासा ब्रजमोहन राम यांनी केला.

फोन उचलला तर थेट मोदींचा आवाज

ब्रजमोहन राम यांनी त्यांच्या राज्यपाल नियुक्तीचा किस्सा कथन केला. एका सकाळी आपल्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमाकांवरून सलग दहा वेळा फोन आले. अज्ञात क्रमांकावरून वारंवार फोन येते होते. पण आपण त्याकडे साफ दुर्लक्ष केले. फोन उचलला नाही. पण काहीतरी महत्त्वाचे असेल म्हणून एकाच क्रमांकावरून वारंवार फोन येत असल्याचे त्यांना वाटले. मग त्यांनी फोन उचलला तर तिकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आवाज आला.

मोदींनी दिले सरप्राईज

पंतप्रधान मोदी यांच्याशी संवाद झाल्यावर त्यांनी ब्रजमोहन राम यांच्या तब्येतीची आणि प्रकृतीची अगोदर चौकशी केली. त्यानंतर पंतप्रधानांनी त्यांची ओडिशाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात येत असल्याचे सरप्राईज त्यांना सांगितले. सुरुवातीला सलग येणाऱ्या फोनमुळे मी गोंधळलो. पण जेव्हा देशाच्या पंतप्रधानांचा आवाज ऐकला, तेव्हा मला अत्यंत सुखद धक्का बसला, अशी प्रतिक्रिया ब्रजमोहन राम यांनी आवर्जून दिली.

नंतर अमित शाह यांचाही फोन

पंतप्रधानांनी फोन केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही ब्रजमोहन राम यांना फोन केला. त्यांनी अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. त्यांनी राम यांना नव्या घटनात्मक जबाबदारीची अधिकृत माहिती दिली. या घडामोडीनंतर राष्ट्रपती भवनाकडून त्यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा करण्यात आली.

ब्रजमोहन राम हे पलामूमधून तीन वेळा लोकसभेत निवडून गेले आहेत. त्यांनी त्यापूर्वी आमदार म्हणूनही काम पाहिलेले आहे. त्यांनी कार्यकर्ता म्हणून भाजपच्या प्रचार फळीत काम केले. त्यांनी पक्ष संघटनेसाठी दीर्घकाळ काम केले. केंद्र सरकारने त्यांना ओडिशाचे राज्यपाल म्हणून नियुक्त केल्यानंतर त्यांना मोठा सुखद धक्का बसला.

Follow Us
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिस...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर अभिजीत दीपकेंचा संताप
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलना
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत अमित शहांचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत...
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत महत्त्वाची चर्चा? उदय सामंत म्हणाले...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक... मोठं कारण समोर
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट...
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट... मद्यधुंद महिलेचा धक्कादायक कारनामा
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली,
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली, 15 मिनिटांसाठी....
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?