AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pm Narendra Modi Full Speech : दहशतवादाविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ ही चांगल्या जगाची गॅरंटी, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे संपूर्ण भाषण

Pm Narendra Modi Full Speech in Marathi : भारताच्या आक्रमकतेमुळे पाकिस्तान वाचण्यासाठी मार्ग शोधत होता. जगभरात तणाव दूर करण्यासाठी धावत होता. पण नंतर मजबुरीने १० मे रोजी पाकिस्तानच्या सैन्याने आमच्या डीजीएमओला संपर्क केला. तोपर्यंत आपण दहशतवाद्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर उद्धवस्त केलं होतं.

Pm Narendra Modi Full Speech : दहशतवादाविरोधात 'झिरो टॉलरन्स' ही चांगल्या जगाची गॅरंटी, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे संपूर्ण भाषण
pm narendra modi 3
| Updated on: May 12, 2025 | 10:37 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज १२ मे २०२५ रोजी रात्री ८ वाजता देशाला संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना गेल्या काही दिवसांत देशाने दाखवलेल्या सामर्थ्याचं आणि संयमाचं कौतुक केलं. विशेषतः भारताच्या पराक्रमी सेना, सशस्त्र दल, गुप्तचर यंत्रणा आणि संशोधकांचं अभिनंदन केलं. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय जवानांनी दाखवलेल्या शौर्यालाही पंतप्रधान मोदींनी सॅल्यूट केले. पहलगाममध्ये २२ एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेखही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. या हल्ल्याने देश आणि जगाला हादरवून सोडले. निष्पाप नागरिकांची हत्या हा दहशतवादाचा घृणास्पद चेहरा होता आणि देशाच्या सद्भवाला तोडण्याचा हा प्रयत्न होता, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

आपण सर्वांनी गेल्या काही दिवसात देशाचं सामर्थ्य आणि संयम पाहिलं आहे. मी सर्वात आधी भारताच्या पराक्रमी सेना आणि सशस्त्र दल, आपल्या गुप्तचर एजन्सी, संशोधक प्रत्येक भारतवासियांकडून सॅल्यूट करतो. आपल्या वीर सैनिकांनी ऑपरेशन सिंदूरच्या लक्ष्याच्या प्राप्तीसाठी असिम शौर्य दाखवलं. मी त्यांच्या शौर्य, साहस, पराक्रमाला आज समर्पित करत आहे. आपल्या देशाच्या मातांना, बहिणींना आणि देशाच्या प्रत्येक मुलीला हा पराक्रम समर्पित करत आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाम रोजी दहशतवाद्यांनी जो हल्ला केला, त्याने देश आणि जगाला हादरवलं होतं. सुट्टी घालवणाऱ्या निर्दोष निष्पाप नागरिकांना धर्म विचारून कुटुंबासमोर, मुलांच्यासमोर बेरहमीने मारणं हा दहशतवादाचा बिभत्स चेहरा होता. क्रुरता होती. देशाच्या सद्भवाला तोडण्याचा हा प्रयत्न होता. माझ्यासाठी व्यक्तिगत रित्या ही पीडा मोठी होती, असे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले.

ऑपरेशन सिंदूर हे देशाच्या कोटी कोटी लोकांच्या भावनाचं प्रतिबिंब

“या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश, प्रत्येक नागरिक, प्रत्येक समाज, प्रत्येक वर्ग, सर्व पक्ष एका सुरात दहशतवादाच्या विरोध कठोर कारवाईसाठी एकजूटला. आपण दहशतवाद्यांना मातीत घालण्यासाठी भारतीय सैन्याला पूर्ण सुट दिली. आज प्रत्येक दहशतवादी, दहतवाद्यांचं प्रत्येक संघटनेला कळून चुकलंय की, आपल्या बहिणीच्या कपाळावरचं कुंकू पुसण्याचा परिणाम काय होतो. ऑपरेशन सिंदूर हे केवळ नाव नाही. ते देशाच्या कोटी कोटी लोकांची भावनाचं प्रतिबिंब आहे. ऑपरेशन सिंदूर न्यायची अखंड प्रतिज्ञा आहे. ६ मे रोजी रात्री उशिरा, ७ मे च्या सकाळी संपूर्ण जगाने या प्रतिज्ञेला परिणामात बदलेलं पाहिलं आहे. भारताच्या सैन्याने पाकिस्तानातील आतंकाच्या अड्ड्यावर, त्यांच्या ट्रेनिंग सेंटरवर अचूक प्रहार केला. दहशतवाद्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल, भारत एवढा मोठा निर्णय घेईल. पण जेव्हा देश एकजूट होतो, नेशन फर्स्टच्या भावनेने भारलेला असतो, राष्ट्र प्रथम असतं तेव्हा फोलादी निर्णय घेतले जातात. परिणाम आणले जातात”, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

“पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर भारताच्या मिसाईलने हल्ला केला, ड्रोनने हल्ला केला, तेव्हा दहशतवाद्यांच्या इमारतीच नव्हे तर त्यांचं आवसानही गळालं. बहावलपूर आणि मुरीदके सारखे दहशतीवाद्यांचे अड्डे ग्लोबल टेररिझमची युनिव्हर्सिटी होती. जगात कोणतेही मोठे अतिरेकी हल्ले झाले. ९य११ असेल,. लंडन ट्युब बॉम्बिंग असेल किंवा भारतातील हल्ले असतील त्यांचं कनेक्शन दहशतवाद्यांच्या या अड्ड्यांशी जोडलेले होते. दहशतवाद्यांनी आमच्या बहिणींचं कुंकू पुसलं. त्यामुळे आम्ही दहशतावद्यांचे हे हेड क्वॉर्टर उद्ध्वस्त केलं. भारताच्या या हल्ल्यात १००हून अधिक खतरनाक अतिरेक्यांना ठार केलं आहे. दहशतवाद्यांचे अनेक आका गेल्या तीन दशकापासून पाकिस्तानात जाहीरपणे फिरत होते. भारताविरोधात साजिश रचत होते. त्यांना भारताने एका झटक्यात खतम केलं. भारताच्या या कारवाईने पाकिस्तान घोर नैराश्यात आला होता. हताश झाला होता. घाबरला होता. त्यामुळेच त्याने दुसरी चूक केली. त्याने आतंकवर भारताच्या कारवाईला साथ देण्याऐवजी पाकिस्तानने भारतावरच हल्ला करण्यास सुरुवात केली. पाकिस्ताने आपल्या स्कूल, कॉलेज, गुरुद्वार, मंदिर आणि नागरिकांच्या घरांना निशाना बनवलं. पाकिस्तानने आपल्या सैन्य ठिकाण्यांना निशाना बनवलं. पण यातही पाकिस्तानचा पर्दाफाश झाला”, असेही पंतप्रधान मोदी म्हटले.

पाकिस्तान वाचण्यासाठी मार्ग शोधत होता

“जगाने पाहिलं की कसं पाकिस्तानचे ड्रोन, पाकिस्तानचे मिसाईल भारताच्या समोर नेस्तनाबूत झाले. भारताच्या सशक्त एअर डिफेन्स सिस्टिमने त्याला आकाशातच नेस्तनाबूत केलं. पाकिस्तानला सीमेवर वार करायचा होता. पण भारताने पाकिस्तानच्या छातीत वार केला. भारताचे ड्रोन आणि मिसाईलने सटिक वार केले. पाकिस्तानच्या एअरबेसवर वार केले. या एअरबेसवर पाकला गर्व होता. पहिल्या तीन दिवसातच भारताने पाकिस्तानला एवढं बरबाद केलं की पाकिस्तानला त्याचा अंदाज नव्हता. भारताच्या आक्रमकतेमुळे पाकिस्तान वाचण्यासाठी मार्ग शोधत होता. जगभरात तणाव दूर करण्यासाठी धावत होता. पण नंतर मजबुरीने १० मे रोजी पाकिस्तानच्या सैन्याने आमच्या डीजीएमओला संपर्क केला. तोपर्यंत आपण दहशतवाद्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर उद्धवस्त केलं होतं. अनेक अतिरेकी मारले होते. पाकिस्तानच्या हृदयातील दहशतवाद्यांचे अड्डे भग्न करून सोडले होते.

त्यामुळे जेव्हा पाकिस्तानकडून याचना केली गेली. पाकिस्तानकडून जेव्हा सांगितलं गेलं की त्यांच्याकडून पुढे कोणतीही दहशतवादी कारवाई केली जाणार नाही. सैन्य गोळीबार होणार नाही. त्यावर भारताने विचार केला. आम्ही पाकिस्तानचे दहशतवादी आणि सैन्य ठिकाण्यावर प्रत्युत्तर म्हणून आता फक्त स्थगित केलं आहे. येत्या काळात आम्ही पाकिस्तान काय भूमिका घेतो कसा वागतो हे पाहणार आहोत. भारताचे तिन्ही दलाने, बीएसएफ, अर्ध सैनिक दल सतत अलर्टवर आहे. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक नंतर आता ऑपरेशन सिंदूर दहशतवादाच्या विरोधात भारताचं धोरण आहे. ऑपरेशन सिंदूरने दहशतवादाच्या विरोधातील लढाईत आता नवीन लाईन खेचली आहे. पहिली म्हणजे, भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर थेट उत्तर देणार. आमच्या पद्धतीने आमच्या अटीवर उत्तर देऊन राहणार. प्रत्येक ठिकाणी जाऊन कठोर कारवाई करणा, जिथून दहशतवादी निर्माण होतात. दुसरं म्हणजे, कोणतंही न्युक्लिअर ब्लॅकमेल भारत सहन करणार नाही, न्यूक्लिअर ब्लॅकमेलच्या आडून वाढणारा दहशतवादी ठिकाण्यावर भारत अचूक आणि निर्णायक प्रहार करणार. तिसरं – आम्ही दशतवाद्यांच्या इशाऱ्यावर चालणारी सरकार आणि दहशतवाद्यांच्या आकांना वेगळं पाहणार नाही”, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

दहशतवादाच्या विरोधात झिरो टॉलरन्स ही चांगल्या जगाची गॅरंटी

“ऑपरेशन सिंदूर दरम्यान जगाने पाकिस्तानचा चेहरा पाहिला आहे. मारलेल्या दहशतवाद्यांना निरोप देण्यासाठी पाकिस्तानचे अधिकारी होते. स्टेट स्पॉन्सर्ड टेररीझमचा हा मोठा पुरावा आहे. भारत आणि आपल्या नागरिकांना वाचवण्यासाठी आम्ही सातत्याने निर्णायक पावलं उचलत राहू. युद्धाच्या मैदानात आम्ही पाकिस्तानला प्रत्येकवेळी धूळ चारली आहे. यावेळी ऑपरेशन सिंदूरने नवीन आयाम जोडला आहे. आम्ही डोंगर आणि रेतीच्या प्रदेशात आपलं कौशल्य सिद्ध केलं आहे. आपल्या मेड इन हत्यारे ही महत्त्वाची ठरल्याचं आपण पाहिलं आहे. प्रत्येक प्रकारच्या दहशतवादा विरोधात आपल्या सर्वांनी एकजूट राहणं आपली एकता, आपली सर्वात मोठी शक्ती आहे. हे युग युद्धाचं नाहीये. पण हे युग आतंकवादाचंही नाहीये. दहशतवादाच्या विरोधात झिरो टॉलरन्स ही एक चांगल्या जगाची गॅरंटी आहे.

पाकिस्तानी फौज आणि पाकिस्तानचं सरकार ज्या पद्धतीने आतंकवादाला खतपाणी घालत आहे, ते एक दिवस पाकिस्तानलाच संपवेल. पाकिस्तानला वाचायचं असेल तर टेरर इन्फ्रास्ट्रक्चरचा सफाया करावा लागेल. त्याशिवाय शांतीचा काहीही मार्ग नाही. भारताचं मत एकदम स्पष्ट आहे. टेरर आणि टॉक एकसाथ होणार नाही. टेरर आणि ट्रेड एकत्र होणार नाही, पाणी आणि खूनही एक साथ वाहू शकत नाही. मी आज विश्वालाही सांगेल की, आमची कोशीश निती होती. पाकिस्तानशी चर्चा होईल तर टेररिझमवरच होईल. चर्चा होईल तर पीओकेवरही होईल. प्रिय देशवासियांनो, आज बुद्ध पौर्णिमा आहे. भगवान बुद्धाने शांतीचा रास्ता दाखवला आहे. शांतीचा मार्गही शक्तीने जातो. मानवता, शांती समृद्धीकडे जाओ, प्रत्येक भारतीय शांतीने जगू शकेल, विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करू शकेल यासाठी भारताचं शक्तीशाली होणं गरजेचं आहे. गरज पडल्यावर या शक्तीचीही गरज आहे. गेल्या काही दिवसात भारताने हेच केलं आहे. मी पुन्हा मी भारताची सैन्य आणि सशस्त्र बलाला सॅल्यूट करतो”, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.