AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नरेंद्र मोदी भावूक, म्हणाले, ‘माझ्या आईच्या निधननंतर…’, लोकसभा निकालावर मोदींची भावनिक प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या निकालावर बोलताना भावूक झाले. "या जनादेशाचे अनेक पैलू आहेत. १९६२ नंतर पहिल्यांदा कोणतं सरकार आपल्या दोन कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर तिसऱ्यांदा वापस आलं आहे. राज्यांमध्ये जिथे विधानसभा निवडणुका झाल्या तिथे एनडीएला भव्य विजय मिळाला आहे", असं नरेंद्र मोदी म्हणाले.

नरेंद्र मोदी भावूक, म्हणाले, 'माझ्या आईच्या निधननंतर...', लोकसभा निकालावर मोदींची भावनिक प्रतिक्रिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी
| Updated on: Jun 04, 2024 | 9:12 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशातील जनता आणि भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी नरेंद्र मोदी भावूक झाले. मोदींनी भाषणावेळी आपल्या आईच्या आठवणींना उजाळा दिला. “आजचा हा क्षण माझ्या वैयक्तिक पातळीवर मलादेखील भावूक करणारा क्षण आहे. माझ्या आईच्या निधननंतर ही माझी पहिली निवडणूक होती. पण देशाच्या कोटी-कोटी माता, भगिनींनी आईची कमतरता मला भासू दिली नाही. मी संपूर्ण देशात जिथे-जिथे गेलो तिथे माता, बहिणी, मुलींनी अभूतपूर्व स्नेह आणि आशीर्वाद दिला. ते आकड्यांमध्ये दिसू शकत नाही. देशाच्या इतिहासात महिलांद्वारे वोटिंगचे सर्व रेकॉर्ड तुटले. या प्रेम आणि आपुलकीला मी शब्दांत व्यक्त करु शकत नाही. देशाच्या माता-भगिनींनी मला नवी प्रेरणा दिली आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

“तुमचं हे स्नेह, प्रेम, या आशीर्वादासाठी मी सर्व भारतीयांचा ऋणी आहे. आज मोठा मंगल आहे, या पवित्रदिवशी एनडीएची लगातार तिसऱ्यांदा सरकार बनणं निश्चित आहे. आम्ही सर्व जनता जनार्दनचे खूप आभारी आहोत. नागरिकांनी भाजपवर, एनडीएवर पूर्ण विश्वास दाखवला आहे. आजचा हा विजय जगाच्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा विजय आहे. भारताच्या संविधानावर असलेल्या अतूट निष्ठेचा विजय आहे. हा विकसित भारताच्या निश्चयाचा विजय आहे. सबका साथ, सबका विकास या मंत्राचा विजय आहे. १४० कोटी भारतीयांचा हा विजय आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

मोदींकडून निवडणूक आयोगाचे आभार

“मी देशाच्या निवडणूक आयोगाचंही अभिनंदन करतो. निवडणूक आयोगाने जगाची सर्वात मोठी निवडणूक इतक्या कुशलतेने संपन्न केली. जवळपास 100 कोटी मतदार, लाखो वोटिंग मशीन, मोठी यंत्रणा आणि निवडणूक कर्मचाऱ्यांनी एवढ्या गरमीत आपलं कर्तव्य निभावलं. त्यांनी आपल्या कर्तव्यभावचं चांगला परिचय दिला. भारताच्या निवडणुकीच्या या सिस्टीमवर प्रत्येक भारतीयाला गर्व आहे. या निवडणुकीचं जगात कुठेही उदाहरण नाही. मी देशवासियांना सांगू इच्छितो की, भारताच्या लोकशाहीत निवडणूक ही ताकद आहे. ही भारताच्या ओळखीला चार चांद लावणारी आहे. मी सर्वांना विनंती करतो करतो की, त्यांनी भारताच्या लोकशाहीचं चांगल्याप्रकारे प्रदर्शन करावं”, असं आवाहन मोदींनी केलं.

“जम्मू-काश्मीरच्या मतदारांनी या निवडणुकीत रेकॉर्ड मतदान करुन अभूतपूर्व उत्साह दाखवला. जगभरात भारताला बदनाम करणाऱ्या ताकदीला आरसा दाखवला आहे. मी देशभरातील जनतेला विजयाच्या या पावन पर्वात आदराने नमन करतो. मी देशभरातील सर्व पक्ष आणि उमेदवारांचं अभिनंदन करतो. सर्वांच्या सहकार्य आणि सहभागाशिवाय ही निवडणूक शक्य नव्हती. मी भाजप आणि एनडीच्या प्रत्येक सहकाऱ्याचे धन्यवाद मानतो”, अशी भावना मोदींनी व्यक्त केली.

मोदींची काँग्रेसवर टीका

“या जनादेशाचे अनेक पैलू आहेत. १९६२ नंतर पहिल्यांदा कोणतं सरकार आपल्या दोन कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर तिसऱ्यांदा वापस आलं आहे. राज्यांमध्ये जिथे विधानसभा निवडणुका झाल्या तिथे एनडीएला भव्य विजय मिळाला आहे. मग ते अरुणाचल प्रदेश असेल, आंध्र प्रदेश, उडीसा असो किंवा सिक्किम. या राज्यांमध्ये काँग्रेसचा सुफडा साफ झालाय. माझ्याकेड डिटेल्स नाहीत. पण कदाचित त्यांचं डिपॉझिट जप्त झालं असेल”, अशी टीका मोदींनी केली.

“भाजप उडीसामध्ये सरकार स्थापन करत आहे आणि लोकसभा निवडणुकीतही उडीसाने खूप चांगलं प्रदर्शन केलं आहे. हे पहिल्यांदा होतंय जिथे महाप्रभू जगन्नाथांच्या भूमीवर भाजपचा मुख्यमंत्री असेल. भाजपने केरळमध्ये जागा जिंकली. आमच्या केरळच्या कार्यकर्त्यांनी अनेकदा बलिदान दिलं आहे. त्यांनी अनेक पिढ्यांपासून संघर्ष केला आहे. पिढ्यांपासून ज्या क्षणांची वाट पाहली तो क्षण आता यशाला स्पर्श करत आहे. तेलंगणात आमची संख्या दुप्पट झालीय. मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसड, दिल्ली, उत्तरांचल अशा अनेक राज्यांमध्ये आमच्या पक्षाने क्लिनस्विप केला आह. मी या सर्व राज्यांचे विशेष आभार मानतो. केंद्र सरकार तुमच्या विकासासाठी कोणतीही कसर सोडणार नाही, असं आश्वासित करतो”, असं आश्वासन नरेंद्र मोदी यांनी दिलं.

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.