खालून जहाज, वरून रेल्वे, मोदींकडून ‘पंबन ब्रिज’चे उद्घाटन; विशेषता काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंबन पुलाचे उद्घाटन केले आहे. हा आशियातील पहिला व्हर्टिकल लिफ्टिंग पूल आहे.

Pamban Bridge : रामनवमीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदी यांनी तमिळनाडूच्या रामेश्वरममधील पंबन येथील ‘व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज’चे उद्घाटन केले आहे. 2019 साली मोदी यांनीच या पुलाच्या कामाचे भूमिपूजन केले होते. हा पूल देशातला पहिला व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज आहे. विशेष म्हणजे हा पूल उभारताना अत्याधुनिक तंत्राचा वापर करण्यात आलेला आहे.
एकूण 535 कोटी रुपयांचा खर्च
हा पूल म्हणजे भारताच्या समृद्ध अभियांत्रिकीचा उत्तम नमूना असल्याचे म्हटले जात आहे. पंबन येथे उभारण्यात आलेला हा पूल आशिया खंडातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज आहे. हा पूल मंडपमपासून रामेश्वरमपर्यंत उभारण्यात आला आहे. पूल उभारण्यासाठी एकूण 535 कोटी रुपयांचा खर्च आला. आज (5 एप्रिल) नरेंद्र मोदी यांनी या पुलाचे उद्घाटन केले आहे. सोबतच त्यांनी या भागातील वेगवेगळ्या 8300 कोटी रुपयांच्या विकासकामांचेही उद्घाटन केले आहे.
पंबन ब्रिज कसे काम करणार?
हा पूल एकूण तीन टप्यांत काम करेल. पहिल्या टप्प्यात या पुलाचा सेंटर स्पॅन व्हर्टिकला उचलला जाईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात जुना पूल टिल्ट होऊन वर उचलला जाईल. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात पुलाखालून जहाज निघेल. अशा तीन टप्प्यांत हा पूल काम करेल. एखादे जहाज आल्यावर हा पूल वर उचलला जाणार आहे.
पुलाची विशेषता काय आहे?
हा पूल पूर्णत: स्वनियंत्रित आहे. म्हणजेच हा पूल वर उचलताना मानवाची गरज पडणार नाही. तंत्रज्ञानाच्या मदतीने तो वर उचलता येईल. हा पूल एकूण 22 मीटपर्यंत वर उचलला जाईल. त्यानंतर या पुलाखालून मोठे जहाज वर उचलले जातील. हा पूल वर उचलण्यासाठी एकूण 5 मिनिट लागतात.
वरून रेल्वे जाणार, खालून जहाज जणार
या पुलाचा 63 मीटरचा भाग हा जहाजांची ये-जा करण्यासाठी वापरला जाईल. जहाजाजवळ मोठे व्यापारी जहाज येताच सायरन वाजेल. त्यानंतर जहाज जवळ येताच हा पूल एकूण 63 मीटरन वर उचलला जाईल. 5 मिनिटांत रेल्वे ट्रॅकचा एक भग 17 मीटरने वर उचलला जाईल. वातावरणातील हवेचा वेग हा 50 किलोमीटर प्रतितास असेल तर पूल वर उचलला जाणार नाही.
Rameswaram, Tamil Nadu: PM Narendra Modi inaugurates New Pamban Bridge – India’s first vertical lift sea bridge and flags off Rameswaram-Tambaram (Chennai) new train service, on the occasion of #RamNavami2025 pic.twitter.com/6ts8HNdwqy
— ANI (@ANI) April 6, 2025
पुलाची एकूण लांबी 6790 फूट
दरम्यान, हा पूल समुद्रात असून त्याची एकूण लांबी ही 6790 फूट आहे. अरबी समुद्रावर हा पुल उभारण्यात आलेला आहे. समुद्रात 2.08 किलोमीटरपर्यंत हा समुद्र पसरलेला आहे. या पुलावर अॅटोमॅटिक सिग्नल सिस्टिम आहे. या पुलाला तयार करण्यासाठी अँटी कोरोजन तंत्रज्ञान, पॉलिसिलॉक्सेन पेंट वापरण्यात आलेला आहे.
