Video : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपधविधीवेळी बिबट्याची हजेरी? व्हिडीओ तुफान व्हायरल

Modi oath ceremony Wild animal Video : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा रविवारी राष्ट्रपती भवन परिसरामध्ये पार पाडला. मात्र एक धक्कादायक व्हिडीओ आता समोर आला आहे. ज्यामध्ये शपथधविधीवेळी बिबट्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

Video : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपधविधीवेळी बिबट्याची हजेरी? व्हिडीओ तुफान व्हायरल
Follow us
| Updated on: Jun 10, 2024 | 6:47 PM

लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. रविवारी संध्याकाळी राष्ट्रपती भवनमध्ये शपधविधी सोहळा पार पडला. नरेंद्र मोदी यांच्या नव्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये एकूण 71 खासदारांनी शपथ घेतली. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर पंतप्रधानपदाची तिसऱ्यांदा शपथ घेणारे नरेंद्र मोदी ठरले आहेत. शपधविधी सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. मात्र या सोहळ्यामधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. शपधविधी सुरू असताना राष्ट्रपती भवनामध्ये बिबट्या फिरत असलेला पाहायला मिळाला.

शपधविधीवेळी बिबट्याचा वावर, व्हिडीओ समोर

राष्ट्रपती भवन परिसरात सुरू असलेल्या शपधविधीवेळी नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतल्यावर इतर मंत्री शपथ घेत होते. मंत्री दुर्गादास उईके हे शपध घेतल्यावर स्वाक्षरी करत होते. यादरम्यान त्यांच्या पाठीमागून सीसीटीव्ही एक बिबट्या मागून चाललेला दिसत आहे. टीव्ही9 मराठी या व्हिडीओची पुष्ठी करत नाही. पण हा व्हिडीओ सोशल माध्यमांवर तुफान व्हायरल होत असलेला पाहायला मिळत आहे.

पाहा व्हिडीओ:-

व्हायरल व्हिडीओमधील प्राणी नेमका कोणता हे अद्याप काही समोर आलेलं नाही. मात्र तो बिबट्या असल्याचं बोललं जात आहे. प्राण्याच्या आकारावरून तो प्राणी बिबट्या आहे अशी चर्चा आहे. पण जर खरोखरच तो प्राणी बिबट्या असेल तर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा मोठा चिंतेचा विषय आहे. कारण तिथे सुरू असलेला कार्यक्रम हा लहान नाहीतर देशाचे पंतप्रधान शपथ घेत होते. या शपधविधीला परदेशातून पाहुणे आले होते. चुकून तो बिबट्या माघारी आला असता तर मोठा अनर्थ घडला असता.

दरम्यान, नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहून सुरक्षा कर्मचारी कुठे होते त्यांना बिबट्या दिसला नाही का? असा सवाल त्यांनी केला आहे. सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं असून सर्वांना सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

Non Stop LIVE Update
ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या पत्नीनं जोडले हात अन् केली विनंती
ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या पत्नीनं जोडले हात अन् केली विनंती.
दिल्ली भाजपच्या कोअर कमिटीत निर्णय, हायकमांडच्या महाराष्ट्र भाजपला...
दिल्ली भाजपच्या कोअर कमिटीत निर्णय, हायकमांडच्या महाराष्ट्र भाजपला....
हे सर्व सरकार घडवतंय...मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर जरांगेंचा आरोप
हे सर्व सरकार घडवतंय...मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर जरांगेंचा आरोप.
मन लागो रे लागो गुरू भजनी... संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे बघा
मन लागो रे लागो गुरू भजनी... संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे बघा.
हुजरेगिरी करून नेता झाला, लायकी काय? संजय राऊतांवर कुणाची जहरी टीका?
हुजरेगिरी करून नेता झाला, लायकी काय? संजय राऊतांवर कुणाची जहरी टीका?.
'...तर भुजबळ नक्की मुख्यमंत्री झाले असते', संजय राऊत नेमकं काय म्हणाले
'...तर भुजबळ नक्की मुख्यमंत्री झाले असते', संजय राऊत नेमकं काय म्हणाले.
मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच पावसाची बॅटिंग; 'या' भागात मुसळधार पाऊस
मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच पावसाची बॅटिंग; 'या' भागात मुसळधार पाऊस.
पाणीपुरी खाण्याचे शौकीन आहात? मग हा व्हिडीओ नक्की बघा, नाहीतर तुम्हाला
पाणीपुरी खाण्याचे शौकीन आहात? मग हा व्हिडीओ नक्की बघा, नाहीतर तुम्हाला.
तुमची एकजूट असेल तर खात्री देतो...शरद पवारांनी फुंकलं विधानसभेच रणशिंग
तुमची एकजूट असेल तर खात्री देतो...शरद पवारांनी फुंकलं विधानसभेच रणशिंग.
बापाची जहागिरदारी नसून नोकऱ्या नीट करा, नाहीतर... पडळकरांचा थेट इशारा
बापाची जहागिरदारी नसून नोकऱ्या नीट करा, नाहीतर... पडळकरांचा थेट इशारा.