PM Modi on Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर स्थगित नाहीच… पंतप्रधान मोदींचं सर्वात मोठं विधान
पुलवामा हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले केले. पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूर हे फक्त स्थगित असल्याचे जाहीर केले आहे, पुढील कारवाई पाकिस्तानच्या वर्तनावर अवलंबून असेल असा इशारा दिला.

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे चोख प्रत्युत्तर दिले. पहलगामच्या हल्ल्यानंतर भारतानं एअर स्ट्राईक केले. या एअर स्टाईकमध्ये 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. या हल्ल्यामध्ये 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. भारताच्या या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून सातत्याने भारतावर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केले. त्यालाही भारताने चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानचे अनेक एअरबेस आणि रडार सिस्टिम उद्ध्वस्त करण्यात आली. आता दोन्ही देशांकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑपरेशन सिंदूरबद्दल एक मोठे विधान केले आहे.
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय, यापुढे पाकिस्तान काय भूमिका घेतो, कसा वागतो हे पाहणार आहोत, असा सूचक इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतंच देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले. तसेच ऑपरेशन सिंदूर, पहलगाम हल्ल्याबद्दलही भाष्य केले.
भारताने पाकिस्तानला एवढं बरबाद केलं की
“ऑपरेशन सिंदूर हे केवळ नाव नाही. ते देशाच्या कोटी कोटी लोकांची भावनाचं प्रतिबिंब आहे. ऑपरेशन सिंदूर न्यायची अखंड प्रतिज्ञा आहे. ६ मे रोजी रात्री उशिरा, ७ मे च्या सकाळी संपूर्ण जगाने या प्रतिज्ञेला परिणामात बदलेलं पाहिलं आहे. भारताच्या सैन्याने पाकिस्तानातील आतंकाच्या अड्ड्यावर, त्यांच्या ट्रेनिंग सेंटरवर अचूक प्रहार केला. दहशतवाद्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल, भारत एवढा मोठा निर्णय घेईल. पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर भारताच्या मिसाईलने हल्ला केला, ड्रोनने हल्ला केला, तेव्हा दहशतवाद्यांच्या इमारतीच नव्हे तर त्यांचं आवसानही गळालं. बहावलपूर आणि मुरीदके सारखे दहशतीवाद्यांचे अड्डे ग्लोबल टेररिझमची युनिव्हर्सिटी होती. जगात कोणतेही मोठे अतिरेकी हल्ले झाले. ९य११ असेल,. लंडन ट्युब बॉम्बिंग असेल किंवा भारतातील हल्ले असतील त्यांचं कनेक्शन दहशतवाद्यांच्या या अड्ड्यांशी जोडलेले होते. दहशतवाद्यांनी आमच्या बहिणींचं कुंकू पुसलं. त्यामुळे आम्ही दहशतावद्यांचे हे हेड क्वॉर्टर उद्ध्वस्त केलं. पहिल्या तीन दिवसातच भारताने पाकिस्तानला एवढं बरबाद केलं की पाकिस्तानला त्याचा अंदाज नव्हता”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
आता फक्त स्थगित केलंय…
“भारताच्या आक्रमकतेमुळे पाकिस्तान वाचण्यासाठी मार्ग शोधत होता. जगभरात तणाव दूर करण्यासाठी धावत होता. पण नंतर मजबुरीने १० मे रोजी पाकिस्तानच्या सैन्याने आमच्या डीजीएमओला संपर्क केला. तोपर्यंत आपण दहशतवाद्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर उद्धवस्त केलं होतं. अनेक अतिरेकी मारले होते. पाकिस्तानच्या हृदयातील दहशतवाद्यांचे अड्डे भग्न करून सोडले होते. त्यामुळे जेव्हा पाकिस्तानकडून याचना केली गेली. पाकिस्तानकडून जेव्हा सांगितलं गेलं की त्यांच्याकडून पुढे कोणतीही दहशतवादी कारवाई केली जाणार नाही. सैन्य गोळीबार होणार नाही. त्यावर भारताने विचार केला. आम्ही पाकिस्तानचे दहशतवादी आणि सैन्य ठिकाण्यावर प्रत्युत्तर म्हणून आता फक्त स्थगित केलं आहे. येत्या काळात आम्ही पाकिस्तान काय भूमिका घेतो कसा वागतो हे पाहणार आहोत”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले.