AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टेरर आणि टॉक, टेरर आणि ट्रेड… पाणी आणि खून… एकसाथ नाहीच; मोदींनी थेट सुनावलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही दिवसांत घडलेल्या भारत पाकिस्तान यांच्यातील घटनांवर लाईव्ह येत देशाला संबोधित केलं आहे. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांनी आपल्या या संबोधनात पाकिस्तानलाही चांगलंच ठणकावलं आहे.

टेरर आणि टॉक, टेरर आणि ट्रेड... पाणी आणि खून... एकसाथ नाहीच; मोदींनी थेट सुनावलं
narendra modi and india pakistan war
Follow us
| Updated on: May 12, 2025 | 8:53 PM

PM Modi on Operation Sindoor : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे ताणले आहेत. भारताने पाकसमर्थित दहशतवादाविरोधात सध्या कठोर भूमिका घेतली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या शस्त्रसंधी झालेली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही दिवसांत घडलेल्या भारत पाकिस्तान यांच्यातील घटनांवर लाईव्ह येत देशाला संबोधित केलं आहे. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांनी आपल्या या संबोधनात पाकिस्तानलाही चांगलंच ठणकावलं आहे. दहशतवाद आणि चर्चा सोबत होऊ शकत नाही. पाणी तसेच रक्तपात एकत्र वाहू शकत नाहीत, असं मोदी यांनी पाकिस्तानला ठणकावून सांगितलं आहे.

नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (12 मे) संपूर्ण देशाला संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी पाकिस्तानसोबतचा व्यापार, पाकिस्तानसोबतची चर्चा तसेच सिंदू जलवाटप करारावर थेट भाष्य केलं. “पाकिस्तानी सैन्य, पाकिस्तानी सरकार दहशतवादाला खतपणी घालत आहे. यामुळे पाकिस्तान स्वत:च नष्ट होईल. पाकिस्तानाला वाचायचं असेल तर अगोदर त्यांना दहशतवादाला नष्ट करावंच लागेल. याशिवाय शांतीचा अन्य कोणताही मार्ग नाही. भारताची भूमिका एकदम स्पष्ट आहे. टेटर आणि टॉक एकत्र होऊ शकत नाही. ट्रेटर आणि ट्रेड एकत्र होऊ शकत नाही. सोबतच पाणी तसेच रक्त एकत्र वाहू शकत नाही,” असं थेट भाष्य मोदी यांनी केलं आहे.

अप्रत्यक्षपणे सिंधू जलवाटप करारावर भाष्य

म्हणजेच नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला स्पष्ट असे तीन संदेश दिले आहेत. पाकिस्तानला भारताशी व्यापार करायचा असेल तर अगोदर दहशतवाद संपवावा लागेल. तसेच पाकिस्तानला भारतासोबतच चर्चा करायची असेल तर अगोदर दहशतवादाला नष्ट करावे लागेल, असं मोदी यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे. सोबतच त्यांनी अप्रत्यक्षणे सिंधू जलवाटप करारावरही भाष्य केलं आहे. दहशतवादी कारवाया चालू असतील तर सिंधू नदीचे पाणीदेखील पाकिस्तानला मिळणार नाही, असे मोदी यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले आहे.

दरम्यान, मोदी यांच्या या थेट इशाऱ्यानंतर आता पाकिस्तान नेमकी काय भूमिका काय घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

16 तारखेपासून अन्नत्यागच नाहीतर तर आता... बच्चू कडूंची मोठी घोषणा काय?
16 तारखेपासून अन्नत्यागच नाहीतर तर आता... बच्चू कडूंची मोठी घोषणा काय?.
मी काय येडगावहून आलोय? नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर भुजबळ भडकले
मी काय येडगावहून आलोय? नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर भुजबळ भडकले.
विमान दुर्घटनेनंतर राऊतांकडून शंका; सायबर हल्ल्याच्या माध्यमातून...
विमान दुर्घटनेनंतर राऊतांकडून शंका; सायबर हल्ल्याच्या माध्यमातून....
दोन दिवसांपूर्वी कोर्ट मॅरेज, लंडनला जात असताना... घटनेनं बाप हादरला
दोन दिवसांपूर्वी कोर्ट मॅरेज, लंडनला जात असताना... घटनेनं बाप हादरला.
कोणाला 10 मिनिट लेट, कोणी स्वतःला..मृत्यूला चकवा देणारे 'ते' तिघं कोण?
कोणाला 10 मिनिट लेट, कोणी स्वतःला..मृत्यूला चकवा देणारे 'ते' तिघं कोण?.
40 सेकंदात कुठं चूक झाली? लंडनला जाणाऱ्या विमान अपघाताची कारणं काय?
40 सेकंदात कुठं चूक झाली? लंडनला जाणाऱ्या विमान अपघाताची कारणं काय?.
लकी नंबरच्या तारखेलाच मृत्यू, विजय रूपाणींच्या 1206 अंकाचा योगायोग काय
लकी नंबरच्या तारखेलाच मृत्यू, विजय रूपाणींच्या 1206 अंकाचा योगायोग काय.
पवारांची राष्ट्रवादी हा एक मोठा पक्ष सोडून कुणाशीही युती करण्यास तयार?
पवारांची राष्ट्रवादी हा एक मोठा पक्ष सोडून कुणाशीही युती करण्यास तयार?.
बावनकुळेंनी घेतली बच्चू कडूंची भेट तर फोनवरून फडणवीसांचं मोठं आश्वासन
बावनकुळेंनी घेतली बच्चू कडूंची भेट तर फोनवरून फडणवीसांचं मोठं आश्वासन.
अपघातात वडिलांचा मृत्यू, ओळख पटवण्यासाठी 8 महिन्याच्या बाळाचे DNA
अपघातात वडिलांचा मृत्यू, ओळख पटवण्यासाठी 8 महिन्याच्या बाळाचे DNA.