पंतप्रधानांनी महत्त्वाची बैठक बोलावली, रात्री 8 वाजता मंत्री आणि अधिकाऱ्यांशी संवाद

पंतप्रधानांनी महत्त्वाची बैठक बोलावली, रात्री 8 वाजता मंत्री आणि अधिकाऱ्यांशी संवाद
narendra modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. रात्री 8 वाजता पंतप्रधान मोदी मंत्री आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.

सचिन पाटील

|

Apr 17, 2021 | 6:52 PM

नवी दिल्ली : देशभरात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने (India corona) आरोग्य यंत्रणेसह प्रशासनावर मोठा ताण आला आहे. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 2 लाख 34 हजार 692 नवीन रुग्ण आढळले, तर तब्बल 1341 जण दगावले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. रात्री 8 वाजता पंतप्रधान मोदी मंत्री आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. त्याआधी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी 11 राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत चर्चा केली. (PM Narendra Modi to hold review meeting at 8 pm tonight on COVID-19 and vaccination situation in India: Official sources)

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील कोरोना स्थिती, लसीकरण, ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीर इंजेक्शन याबाबत आढावा घेणार आहेत. पंतप्रधान मोदी हे या बैठकीत अधिकाऱ्यांशी आणि मंत्र्यांशी चर्चा करतील.

यापूर्वी पंतप्रधानांनी आरोग्य, स्टील, परिवहन मंत्रालयासह विविध विभागांशी संवाद साधून ऑक्सिजन पुरवठ्याबाबत आढावा घेतला होता.

देशात कोरोनाचा उद्रेक

देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दररोज नवनवे विक्रम गाठताना दिसत आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे 2 लाख 34 हजार 692 नवीन रुग्ण भारतात आढळले आहेत. 1 लाख 23 हजार 354 जणांना डिस्चार्ज मिळाला, तर 1341 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

उद्धव ठाकरेंचा मोदींना तीनवेळा फोन 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी गेल्या 24 तासात तब्बल तीनवेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना फोन केला. महाराष्ट्रातील कोरोनाचा उद्रेक (Maharashtra coronavirus) आणि ऑक्सिजन तुटवड्यामुळे (Oxygen shortage) परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळेच महाराष्ट्राला 1200 ते 1500 मेट्रीक टन ऑक्सिजन मिळावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे केली. या दोघांमध्ये महाराष्ट्रातील आणि मुंबईतील ऑक्सिजनचा तुटवड्याबाबत चर्चा झाली.

महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचे आकडे काय?

महाराष्ट्रात काल (16 एप्रिल) 63,729 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत. राज्यात सध्या 6 लाख 38 हजार 034 सक्रिय कोरोना रुग्ण असून, राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 37 लाख 03 हजार 584 झाली आहे. राज्यात काल 398 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील मृत्यू दर 1.61% इतका झालाय. कालच्या दिवसात 45 हजार 335 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

संबंधित बातम्या  

Explained: कोरोना निदानात पल्स ऑक्‍सिमीटरचं महत्त्व वाढलं, काय उपयोग, कसं वापरावं, किंमत किती?

देशात कोरोनाचे 2 लाख 34 हजार 692 नवीन रुग्ण, 1341 जण दगावले

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें