AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च पुरस्कार, ‘बिंटांग आदिपूर्णा रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया’ चा किताब, व्यापाराला नवीन दिशा, पूर्वेत भारताचा मोठा दबदबा

PM Narendra Modis visit to Indonesia: 'ॲक्ट ईस्ट' धोरणानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्वेतील देशांच्या दौऱ्यावर आहेत. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड दौऱ्यातून व्यापाराला नवीन दिशा मिळणार आहे. तर पूर्वेत भारताचा दबदबा वाढणार आहे. इंडोनेशियासोबतच्या करारामुळे चीनला मोठा शह बसेल.

पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च पुरस्कार, ‘बिंटांग आदिपूर्णा रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया’ चा किताब, व्यापाराला नवीन दिशा, पूर्वेत भारताचा मोठा दबदबा
मोदी इंडोनेशियाच्या दौऱ्यावर
| Updated on: Jul 07, 2026 | 11:02 AM
Share

PM Narendra Modis visit to Indonesia: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी तीन दिवसांच्या इंडोनेशियाच्या दौऱ्यावर पोहचले. 6 ते 8 जुलैच्या या दौऱ्यात दोन्ही देशातील जुन्या संबंधांना पुन्हा उजाळा मिळेलच. पण व्यापारी आणि इतर अनेक मुद्दांवर नवीन करार होतील. मे 2018 मध्ये भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीवर एकमत झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच भारतीय संस्कृतीशी नाळ जोडलेल्या इंडोनेशियाच्या दौऱ्यावर आहेत. चीनचा या पट्ट्यातील वाढता दबदबा आणि ब्राह्मोस क्षेपणास्त्राविषयी दोन्ही देशातील रणनीती हा कळीचा मुद्दा ठरू शकतो.

‘बिंटांग आदिपूर्णा रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया’ चा किताब

मोदी इंडोनेशियाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांना इंडोनेशियाने आपला सर्वोच्च सन्मान देण्याचे जाहीर केले आहे. ‘बिंटांग आदिपूर्णा रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया’ हा किताब देऊन मोदींचा सन्मान करण्यात येणार आहे. इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांनी ही घोषणा केली आहे. जगातील अनेक देशांनी मोदींचा सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान केला आहे. त्यात या पुरस्काराची भर पडली आहे.

आसियान क्षेत्रातील दुसरा सर्वात मोठा व्यापारी करार

परराष्ट्र मंत्रालयानुसार, इंडोनेशिया आसियान क्षेत्रात भारताचा दुसरा व्यापारातील सहकारी, सहभागीदार म्हणून समोर आलेला आहे. गेल्या दोन दशकात दोन्ही देशातील व्यापारात विलक्षण वाढ झाली आहे. वर्ष 2005-06 मध्ये व्दिपक्षीय करार 4.3 अब्ज अमेरिकन डॉलर इतका होता. 2022-23 या वर्षात ही वृद्धी 38.84 अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत पोहचली. तर वर्ष 2024-25 मध्ये दोन्ही देशात एकूण व्यापार 28.15 अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत पोहचला.

भारताची निर्यात 5.38 अब्ज डॉलर, आयात 22.78 अब्ज डॉलर

वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2024-25 मध्ये भारताने इंडोनेशियात 5.38 अब्ज अमेरिकन डॉलरची निर्यात केली. तर इंडोनेशियाने या कालावधीत 22.78 अब्ज अमेरिकन डॉलरची आयात केली. दोन्ही देशात एकूण 28.15 अब्ज अमेरिकन डॉलर इतका व्यापार झाला.

कोळसा आणि पाम तेलासाठी इंडोनेशियाचा आधार

भारत इंडोनेशियातून कोळसा खरेदी करणारा दुसरा देश आहे. तर कच्चे पाम तेल आयात करणाऱ्यांमध्ये सुद्धा भारताचा समावेश आहे. याशिवाय भारत इंडोनेशियाकडून खनिज, रबर, पल्प आणि पेपर, हायड्रोकार्बन आयात करते. तर रिफाईंड पेट्रोलियम उत्पादन, मोठी वाहनं, दूरसंचार उपकरणं, कृषी उत्पादनं, गोवंशीय मांस, औद्योगिक उत्पादन आणि प्लास्टिकची निर्यात भारत करतो.

या मोठ्या कराराकडे जगाचे लक्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंडोनेशिया दौऱ्यात मोठे निर्णय होऊ शकतात. त्यात इंडोनेशियासाठी खास EVM विकसीत करण्यासाठी भारत सहकार्य करणार आहे.

ऑपरेशन सिंदूरमध्ये हवेतून हवेत लक्षााचा अचूक भेद करणारे क्षेपणास्त्राचा भारताने यशस्वी वापर केला. ही क्षेपणास्त्रे इंडोनेशिया आयात करणार आहे.

स्टील, निकेल आणि दुर्मिळ घटक (Rare Earth) अशा महत्त्वांच्या खनिज साखळी पुरवठा दोन्ही देश मजबूत करण्यावर भर देतील.

इंडोनेशिया ब्रह्मोस क्षेपणास्त्रांचा साठा वाढवत आहे. अधिक ब्रह्मोस बॅटरी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

चीनला शह देण्यासाठी मलक्का समुद्रधुनीवर नजर ठेवणारे आणि भारताच्या ग्रेट निकोबार बंदरापासून 100 मैल अंतरावर सबांग बंदर भारत आणि इंडोनेशिया संयुक्तपणे विकसीत करणार आहेत.

Follow Us
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु