AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुलाखतीसाठी पॉडकास्टर फ्रीडमन यांचा 45 तासांचा उपवास, मोदींनी उपवासाचे महत्व…

PM Narendra Modi Podcast With Lex Fridman: शरीर, मन, बुद्धी, आत्मा आणि मानवता यांच्या उन्नतीसाठी आपल्या शास्त्रांमध्ये सखोल चर्चा आहे. हे साध्य करण्यासाठी ते विविध मार्ग, परंपरा आणि प्रणालींची रूपरेषा देतात आणि उपवास हा त्यापैकी एक आहे, परंतु केवळ उपवास हे सर्व काही नाही,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुलाखतीसाठी पॉडकास्टर फ्रीडमन यांचा 45 तासांचा उपवास, मोदींनी उपवासाचे महत्व...
पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन सोबत नरेंद्र मोदीImage Credit source: टीव्ही 9 भारतवर्ष
| Updated on: Mar 16, 2025 | 6:37 PM
Share

PM Modi Podcast With Lex Fridman: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळीस उपवास ठेवला होता. त्यावेळी त्यांनी 11 दिवसांचा उपवास ठेवला होता. अकरा दिवस कठीण तप केले होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुलाखतीपूर्वी अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांनी 45 तासांचा उपवास ठेवला. रविवारी नरेंद्र मोदी यांचा तीन तासांचा पॉडकास्ट प्रसारीत झाली. त्यावेळी हा खुलासा मोदी यांनी केला. तीन तासांच्या या पॉडकास्टमध्ये मोदी यांनी आपल्या जीवनातील अनेक अनुभव सांगितले आहे.

उपवासाचे असे आहे महत्व

अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांच्याबाबत खुलासा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले, लेक्स फ्रीडमन यांनी मुलाखतीसाठी 45 तासांचा उपवास ठेवल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी या मुलाखतीपूर्वी 45 तास केवळ पाणी घेतले. यावेळी मोदी यांनी पॉडकास्टमध्ये उपवासाचे महत्व सांगितले. उपवासामुळे आपली इंद्रीये अधिक क्रियाशील होतात. मानसिक आरोग्य चांगले होते. तसेच शिस्त निर्माण होते, असे मोदी यांनी सांगितले.

उपवासामुळे हे होतात फायदे

उपवासाबद्दल बोलताना मोदी यांनी सांगितले की, उपवास म्हणजे केवळ जेवण सोडणे नाही. ती एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे. त्यांचा संबंध आयुर्वेदाशी आहे. शरीरातील विष कमी करण्यासाठी उपवास मदत करतो. उपवास करण्यापूर्वी तो चांगले हायड्रेट करतो. त्यामुळे उपवासच्या वेळी आळस वाटण्याऐवजी अधिक उत्साह वाटतो. तसेच शरीर आपल्याला आणखी कठोर परिश्रम करण्यास मदत करतो.

फ्रीडमन यांच्या उपवासावर मोदी म्हणाले, मला खरोखरच आश्चर्य वाटते आणि तुम्ही उपवास करत आहात याचा मला आनंद झाला. तुम्ही मला आदर देण्यासाठी उपवास करत आहात, हे पाहून मला आश्चर्य वाटले. याबद्दल मी तुमचे मनःपूर्वक आभार मानतो. भारतीय धार्मिक परंपरा ही खऱ्या अर्थाने जीवनपद्धती आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने एकदा हिंदू धर्माचा चपखल अर्थ लावला होता. त्यांनी म्हटले आहे की हिंदू धर्म हा कर्मकांड किंवा उपासनेच्या पद्धतींबद्दल नाही, तर ती एक जीवनपद्धती आहे.

शरीर, मन, बुद्धी, आत्मा आणि मानवता यांच्या उन्नतीसाठी आपल्या शास्त्रांमध्ये सखोल चर्चा आहे. हे साध्य करण्यासाठी ते विविध मार्ग, परंपरा आणि प्रणालींची रूपरेषा देतात आणि उपवास हा त्यापैकी एक आहे, परंतु केवळ उपवास हे सर्व काही नाही, असे मोदी यांनी म्हटले.

पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.