AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओ ताई लेकरू हरवलं माझं, ओ भाऊ तुम्ही बघितलं का? नवी दिल्ली रेल्वे स्थानकातील घटना

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर रेल्वेची वाट पाहत असताना एका महिलेचा डोळा लागला. तिने डोळे उघडले तेव्हा तिला तिचा अडीच वर्षांचा मुलगा दिसेना. ती धावाधाव करू लागली. हात-पाय जोडून म्हणू लागली, ‘ओ ताई लेकरू हरवलं माझं, ओ भाऊ तुम्ही बघितलं का?’ संपूर्ण प्रकरण जाणून घ्या.

ओ ताई लेकरू हरवलं माझं, ओ भाऊ तुम्ही बघितलं का? नवी दिल्ली रेल्वे स्थानकातील घटना
| Edited By: | Updated on: Feb 11, 2025 | 1:00 PM
Share

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर रेल्वेची वाट पाहणाऱ्या महिलेला डोळा लागला आणि तिचं लेकरूच गायब झालं. तिचं संपूर्ण जग लुटलं गेल्यासारखा तिला धक्का बसला. ती वेड्यासारखी रडत अख्खं प्लॅटफॉर्म फिरत होती. जो कोणी तिला दिसेल त्याला प्रश्न विचारायची, ‘भैय्या, तुम्ही माझ्या मुलाला पाहिलं आहे का? ओ ताई माझं अडीच वर्षाचं लेकरू तुम्ही पाहिलं का? ‘महिलेचा प्रश्न ऐकून सर्वजण नकारार्थी मान हलवून पुढे सरसवत होते. पण, माताच ना ती. ती हादरून गेली होती.

सर्व प्रयत्न करूनही महिलेला मूल न सापडल्याने तिने नवी दिल्ली रेल्वे पोलिस ठाणे गाठले. त्याचवेळी महिलेची कहाणी ऐकल्यानंतर पोलीस कर्मचारीही हैराण झाले. सुमारे चार महिन्यांपूर्वी या घटनेत सहभागी झालेल्या महिलेने पोलिसांना सांगितले की, 16/17 ऑक्टोबर 2024 च्या रात्री ती आपल्या अडीच वर्षांच्या मुलासह नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या मुख्य हॉलमध्ये झोपली होती. तिनं डोळे उघडले तेव्हा तिला दिसले की तिचा मुलगा जवळ नव्हता.

महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ एफआयआर दाखल करून सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक अनोळखी महिला मुलाचे अपहरण करून मुलाला रिक्षातून घेऊन जाताना दिसत आहे. पोलिसांनी लगेचच रिक्षाची ओळख पटवून चालकाचा शोध घेतला. चौकशीदरम्यान रिक्षाचालकाने पोलिसांना सांगितले की, त्याने बदरपूर-फरिदाबाद सीमेवरील टोल नाक्याजवळ अज्ञात महिलेला मुलासह सोडले होते.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान अशाच प्रकारच्या आणखी एका प्रकरणाची माहिती पोलिस पथकाला मिळाली. ही घटना 31 जुलै 2023 रोजी घडली होती. या प्रकरणी तिकीट काऊंटर हॉलमधून तीन वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणातही हीच महिला मुलाचे अपहरण करून रिक्षातून निघून जाताना दिसली. रिक्षाचालकाची चौकशी केली असता त्याने संशयिताला अपहृत मुलासह बदरपूर-फरिदाबाद सीमेवरील टोलनाक्याजवळ सोडल्याचे निष्पन्न झाले.

पोलिस या दोन्ही प्रकरणांची उकल करण्याचा प्रयत्न करत असतानाच तिसरी घटना त्यांच्या निदर्शनास आली. ही घटना 21 जानेवारी 2025 रोजी घडली होती. नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या फूड कोर्टवेटिंग हॉलमधून एका महिलेने चार महिन्यांच्या चिमुरडीचे अपहरण केल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांच्या रेल्वे युनिटने पूर्ण ताकदीनिशी हे प्रकरण सोडविण्यास सुरुवात केली.

एसीपी रेल्वे संजीव चाहर यांच्या मार्गदर्शनाखाली एसएचओ (एनडीआरएस) निरीक्षक विश्वनाथ पासवान, निरीक्षक विजय सामरिया, एसआय दीप शर्मा, लेडी एसआय विद्या, एएसआय अजित सिंह, बगीचा सिंह, मनोज, संतोष, हेड कॉन्स्टेबल हरी किशन, गौरव तोमर, सुमित, योगेंद्र, कॉन्स्टेबल शेखर, अमित, गुलशन, लेडी कॉन्स्टेबल बबिता, मोनिका आणि रितू यांचा समावेश होता.

पोलिसांनी 700 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले पोलिसांच्या पथकाने 700 हून अधिक सीसीटीव्ही स्कॅन करून महिलेशी संबंधित अधिकाधिक माहिती गोळा केली. बराच शोध घेतल्यानंतर मुलाला चोरणारी महिला आपल्या पतीसोबत राहत असलेल्या ठिकाणी पोहोचण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी महिला आणि तिच्या पतीला अटक केली आहे. तसेच त्याच्या मागावर अपहृत दोन मुलेही सापडली आहेत.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.