देवदर्शनाला गेलेल्या गर्भवती महिलेवर काळाचा घाला, जे घडलं ते ऐकून तुम्हालाही धक्काच बसेल

वैजंता गोगावले, Tv9 मराठी

|

Updated on: Mar 17, 2023 | 2:13 PM

पती-पत्नी बालाजी दर्शनाला गेले होते. दर्शन घेऊन घरी परतत असताना वाटेतच त्यांच्या कारला अपघात होऊन आग लागली.

देवदर्शनाला गेलेल्या गर्भवती महिलेवर काळाचा घाला, जे घडलं ते ऐकून तुम्हालाही धक्काच बसेल
भरधाव ट्रकची कारला धडक
Image Credit source: Google

जींद : बालाजी दर्शनाहून घरी परतत असताना रस्त्यात कारला अचानक आग लागली. या आगीत गर्भवती महिलेचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना हरयाणात घडली आहे. महिलेचा पती यातून सुखरुप बचावला आहे. सिवाहा आणि धडोली दरम्यान महामार्गावर घडली. याप्रकरणी पिल्लूखेडा पोलीस स्टेशन अधिक तपास करत आहेत. सदर दाम्पत्य सिवाहा गावातील रहिवासी आहे. सीमा असे मयत महिलेचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.

पती-पत्नी देवदर्शनासाठी राजस्थानला गेले होते

सिवाहा गावात राहणारे जितेंद्र आपली गर्भवती पत्नी सीमा हिच्यासोबत राजस्थानमधील बालाजी येथे दर्शनासाठी गेले होते. शुक्रवारी सकाळी दोघेही बालाजीचे दर्शन घेऊन 152 डी मार्गे घरी परतत होते. याचदरम्यान सिवाहा ते धाडोली गावादरम्यान त्यांच्या कारला संशयास्पदरित्या आग लागली. या आगीत गर्भवती सीमा ही जिवंत जळाली.

अपघातातून पती सुखरुप बचावला

जितेंद्र याने कशीबशी गाडीतून स्वतःची सुटका केली. घटनेची माहिती मिळताच पिल्लूखेडा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांना घटनास्थळावरून दुसऱ्या वाहनाचा तुटलेला बंपरही सापडला आहे. तर ट्रकच्या धडकेने कारला आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सध्या पिल्लूखेडा पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI