AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Explained : अमेरिका खरच आपला मित्र असेल, तर त्यांनी भारतासाठी फक्त एक छोटीशी गोष्ट करावी

India-Pakistan War Situation : 1971 च्या तुलनेत आज भारत-अमेरिका संबंध खूप दृढ झाले आहेत. भारत आपला चांगला मित्र असल्याच अमेरिका सांगत असतो. आता सध्याच्या युद्ध सदृश्य स्थितीत पाकिस्तान अमेरिकेच ऐकत नाहीय. त्यामुळे अमेरिका खरोखरच भारताला आपला चांगला मित्र मानत असेल, तर त्यांनी फक्त एक गोष्ट करावी. पाकिस्तानची सगळी हवा निघून जाईल आणि अमेरिकेची सुद्धा इज्जत वाचेल.

Explained : अमेरिका खरच आपला मित्र असेल, तर त्यांनी भारतासाठी फक्त एक छोटीशी गोष्ट करावी
modi and trumpImage Credit source: Tv9
| Updated on: May 10, 2025 | 4:08 PM
Share

सध्या भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध सदृश्य स्थिती आहे. पाकिस्तान या सगळ्या परिस्थितीला जबाबदार आहे. भारतावर जळफळाट करणाऱ्या या देशाची आर्थिक स्थिती वाईट आहे. गृह युद्धाच्या उंबरठ्यावर हा देश आहे. पण, तरीही युद्ध लढण्याची पाकिस्तानची खुमखुमी अजून गेलेली नाही. मागचे सलग तीन दिवस त्यांनी भारतावर हवाई हल्ल्याचा प्रयत्न केला. भारताने आपल्या मजबूत एअर डिफेन्स सिस्टिमद्वारे त्यांचे सर्व हल्ले परतवून लावले. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या पाकिस्तानने दहशतवाद्यांवरच्या प्रेमाखातर युद्धासारखी स्थिती आणली आहे. भारताने 7 मे रोजी पाकिस्तानात केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये अनेक मोठे दहशतवादी मारले गेले.

या दहशतवाद्यांचे पाकिस्तानने राजकीय इतमामात दफनविधी केले व आपली खरी ओळख जगाला दाखवून दिली. कारण काही जागतिक दहशतवाद्यांसोबत पाकिस्तानातले नेते, लष्करी अधिकारी या दहशतवाद्यांच्या अंत्यविधीला हजर होते. त्याचे व्हिडिओ, फोटो समोर आले आहेत. पाकिस्तानने मागच्या तीन दिवसात जम्मू-काश्मीरपासून गुजरातच्या भूजपर्यंत म्हणजे उत्तरेकडून पश्चिमेपर्यंत अनेक हल्ले केले आहेत. यासाठी पाकिस्तानने ड्रोन, मिसाइल आणि त्यांची फायटर विमान वापरली आहे.

तसा करार आहे, पण…

पाकिस्तानने त्यांचं F-16 विमानही भारतावर हल्ल्यासाठी वापरलं आहे. F-16 हे अमेरिकेने पाकिस्तानला दिलेलं फायटर जेट आहे. पाकिस्तानला अमेरिकेने अशी 75 फायटर जेट्स दिली आहेत. फक्त दहशतवाद्यांविरोधात लढण्यासाठी अमेरिकेने ही विमानं दिली आहेत, तसा करार आहे. पण पाकिस्तान भारताविरोधात या विमानांचा वापर करतोय. भारत मूळातच ही सर्व लढाई दहशतवादाविरोधात लढत आहे.

त्यांचीच इज्जत वाचेल

अमेरिकेने दहशतवादाविरोधात लढण्यासाठी भारताला पाठिंबा दिला आहे. अशावेळी पाकिस्तान F-16 विमानासंदर्भात अमेरिकेशी केलेला करार मोडत आहे. अशावेळी अमेरिकेने काहीही करुन, पाकिस्तानला F-16 विमानांचा वापर करायला देऊ नये. तितकी सक्ती अमेरिकेने दाखवावी. एवढीच अमेरिकेकडून माफक अपेक्षा आहे. कारण सध्याच्या घडीला पाकिस्तानकडे जी शस्त्र आहेत, त्यातल्या त्यात हेच एक थोडं चांगलं शस्त्र आहे. मागच्या तीन दिवसात भारताने पाकिस्तानची काही F-16 विमान पाडल्याच्या बातम्या येत आहेत. अमेरिकेने पाकिस्तानला या विमानाचा वापर करण्यापासून रोखावं, त्यांचीच इज्जत वाचेल.

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त.