AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! दूध प्रति लिटर 2 रुपयांनी स्वस्त, तूप आणि पनीरच्याही किंमती उतरल्या, जीएसटीच्या निर्णयानंतर…

काही वस्तूंवरील जीएसटी पूर्णपणे काढला तर काहींवरील कमी करण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी जीएसटी काउंसिलची 56वी बैठक घेतली. विशेष म्हणजे या बैठकीमध्ये काही मोठे निर्णय घेत लोकांना दिलासा दिला. आता त्यानंतर काही वस्तूंच्या किंमती कमी झाल्या आहेत.

मोठी बातमी! दूध प्रति लिटर 2 रुपयांनी स्वस्त, तूप आणि पनीरच्याही किंमती उतरल्या, जीएसटीच्या निर्णयानंतर...
GST
| Updated on: Sep 16, 2025 | 4:01 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टच्या भाषणादरम्यान मोठी घोषणा करत जीएसटीमध्ये काही बदल करणार असल्याचे सांगितलं. काही वस्तूंवरील जीएसटी पूर्णपणे काढला जाईल तर काहींवरील कमी करणार. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी जीएसटी काउंसिलची 56वी बैठक घेतली. विशेष म्हणजे या बैठकीमध्ये काही मोठे निर्णय घेत लोकांना दिलासा दिला. घरातील दैनंदिन वापरात लागणाऱ्या वस्तूंवरील जीएसटी काढून सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा मिळाला. जीएसटी काढला गेल्याने वस्तू थेट स्वस्त झाल्या. सरकारने जीएसटी सुधारणांच्या घोषणेनंतर आता परिणाम दिसून येतोय.

मदर डेअरीने मंगळवारी दुधाच्या किंमतीत कपात केली आहे, ज्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला. 22 सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार आहेत, परंतु त्यापूर्वीच कंपनीने त्यांच्या पॅकेज्ड दुधाच्या किंमती प्रति लिटर दोन रुपयांपर्यंत कमी केल्या आहेत. आता मदक डेअरीने 1 लिटर दुधाची किंमत 77 वरून 75 रुपये केलीये. हेच नाही तर यासोबतच पनीर आणि तुपाचीही किंमत कमी केलीये.

सरकारने 3 सप्टेंबर रोजी जीएसटी सुधारणांची घोषणा केली आणि त्यानंतर निर्मला सितारमण यांनी जीएसटी काउंसिलची 56वी बैठक घेऊन नेमक्या कोणत्या वस्तूंवरील जीएसटी काढला जाईल , कोणत्या वस्तूंवरील कमी होईल हे स्पष्ट सांगितले. घरगुती लागणाऱ्या वस्तूंवरील जीएसटी काढण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला. नवीन नियमांसह सर्व उत्पादनांवर ग्राहकांना 100 टक्के कर सवलत देण्यासाठी मदर डेअरीने आता हे पाऊल उचलल्याचे बघायला मिळतंय.

200 ग्रॅम पनीरचे पॅकेट 95 रुपयांऐवजी 92 रुपयांमध्ये मिळेल. 500 ग्रॅम बटर 305 रुपयांऐवजी 285 रुपयांना मिळेल.  तर 100 ग्रॅम बटर 62 रुपयांऐवजी 58 रुपयांना मिळेल. तूपाच्या 1 लिटर पॅकची किंमत 675 रुपयांवरून 645 रुपये करण्यात आली आहे. 1 लिटर तुपाच्या पॅकची किंमत 750 रुपयांवरून 720 रुपये प्रति लिटर 30 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. यामुळे लोकांना मोठा दिलासा मिळालाय. मागील काही दिवसांपासून लोकांची एक ओरड होती की, सतत सीएसटीमुळे वस्तूंवरील दर वाढत आहेत. प्रत्येक गोष्टीवर जीएसटी लावला जातोय. शेवटी आता मोठा दिलासा मिळाल्याचे बघायला मिळतंय

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...