पंतप्रधान मोदी म्हणाले, त्यांनी जादू शिकली, ३ डिसेंबरला जादुगार होणार छु मंतर…

राजस्थानमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका 2023 ला फक्त काही दिवस उरले आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्न करत आहेत. भाजप आणि काँग्रेसचे सर्व वरिष्ठ केंद्रीय नेते सध्या पक्षाच्या मदतीसाठी राजस्थानला पोहोचले आहेत.

पंतप्रधान मोदी म्हणाले, त्यांनी जादू शिकली, ३ डिसेंबरला जादुगार होणार छु मंतर...
PM NARENDR MODI AND CM ASHOK GELHOTImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Nov 18, 2023 | 5:24 PM

राजस्थान | 18 नोव्हेंबर 2023 : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने उरले आहेत. त्यामुळे या निवडणुकांकडे सत्तेची सेमी फायनल म्हणून पाहण्यात येत आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांदरम्यान मोर्चे आणि आश्वासनांची उधळण झाली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममध्ये कोणाचे सरकार बनवायचे याचा निर्णय 3 डिसेंबरला होणार आहे. मध्यप्रदेश विधानसभेच्या 230 जागांसाठी 17 नोव्हेंबर रोजी मतदान झाले. तर, 200 विधानसभेच्या जागा असलेल्या राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबरला मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राजस्थानमध्ये प्रचाराचा जोर वाढला आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा राजस्थानमध्ये झाली. यावेळी त्यांनी कॉंग्रेसवर टीका केलीय.

राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी अजमेरच्या किशनगडमधील सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेस उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. त्यावेळी त्यांनी भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला. गेल्या 10 वर्षांपासून केंद्रातील भाजप सरकारने केवळ महागाई वाढवण्याचे काम केले आहे. गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी वाढत आहे. भाजप राजस्थानवर सत्ता गाजवण्यास हतबल दिसत आहे. त्यांनी आधी त्यांच्या सरकारच्या कार्यकाळात केलेली कामे दाखवावीत अशी टीका केली.

ही मोदींची हमी आहे

राजस्थान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भरतपूर येथे विजय संकल्प सभा घेतली. भारत मातेचा जयघोष करत पंतप्रधान मोदींनी भाषणाला सुरुवात केली. यावेळी आपल्या भाषणात त्यांनी राजस्थान भाजपचे अभिनंदन तर पक्षाच्या संकल्प पत्राचे कौतुक केले. भाजपच्या ठरावात दिलेल्या आश्‍वासनांचा पुनरुच्चार करून ते पूर्ण करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, असे ते म्हणाले. ही आश्वासने पूर्ण होतील, ही मोदींची हमी आहे असेही त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

संपूर्ण जग भारताचे कौतुक करत आहे.

संपूर्ण जग भारताच्या पराक्रमाला मान्यता देत आहे. जी – 20 परिषदेचा संदर्भ देत त्यांना जनतेला विचारले, जगात भारताची शान गाजत आहे असे तुम्हाला वाटते का? तुम्हाला अभिमान, आनंद, समाधान वाटत आहे. हे सर्व कोणामुळे होत आहे? हे मोदींमुळे नाही तर तुमच्या मतामुळे हा चमत्कार घडत आहे. तुमच्यामुळे हे घडत आहे. कारण एका मताने तुम्ही दिल्लीत स्थिर आणि मजबूत सरकार बनवले. त्यामुळे भारत प्रत्येक क्षेत्रात जिंकत आहे असे मोदी म्हणाले.

भारत एक नेता होत आहे

एकीकडे भारत जगात अग्रेसर होत आहे. दुसरीकडे राजस्थानमध्ये गेल्या पाच वर्षांत काय झाले? गेल्या पाच वर्षात जो विध्वंस झाला त्याला जबाबदार कोण? राजस्थानला मागे ढकलण्यास जबाबदार कोण? येथील तरुणांचे भविष्य उध्वस्त करण्यास जबाबदार कोण? येथे काँग्रेसने राजस्थानला भ्रष्टाचार, दंगली आणि गुन्ह्यांमध्ये आघाडीवर केले आहे. म्हणूनच राजस्थान म्हणतंय जादूगारजी कडून मतं का मिळत नाहीत? असा टोला त्यांनी मुख्यमंत्री अशोक गेलहोत यांना लगावला.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची खिल्ली उडवत नरेंद्र मोदी म्हणाले, राजस्थानमध्ये आतापासून एक आठवड्यानंतर मतदान होणार आहे. सगळीकडे एकच गुंजन आहे. ही जनतेची हाक आहे. भाजप सरकार येणार आहे. येथील काही लोक स्वतःला जादूगार म्हणवतात. अशोक गेहलोत यांचे वडील जादूगार होते. त्यांच्याकडून त्यांनी जादू शिकली. काही काळ त्यांनी हा व्यवसायही स्वीकारला. मात्र, आता राजस्थानचे लोक त्यांना सांगत आहेत की ३ डिसेंबरला काँग्रेस संपेल, अशी टीका त्यांनी केली.

TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद
TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद.
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?.
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका.
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?.
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल.
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?.
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?.
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '.
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे.
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड.