AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओमराजे निंबाळकर यांनी नरेंद्र मोदी यांना काय निवेदन दिलं? फोटो व्हायरल

फुटीर खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला पोहोचले. यादरम्यान त्यांच्यात चर्चा झाली. शिवसेना ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या 6 खासदारांसोबत नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्रपणे संवाद साधल्याची माहिती मिळतंय.

ओमराजे निंबाळकर यांनी नरेंद्र मोदी यांना काय निवेदन दिलं? फोटो व्हायरल
om raje nimbalkarImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Aug 07, 2026 | 5:44 PM
Share

दिल्लीत पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या पावसाळी अधिवेशनानिमित्ताने सर्व खासदार दिल्लीत आहेत. यादरम्यानच फुटीर खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला पोहोचले. यादरम्यान ब्रेकफास्टही त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबत केला. शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केलेले 6 खासदारही नरेंद्र मोदी यांच्या भेटीला पोहोचले. शिवसेना ठाकरे गटातून 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली आणि त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. या खासदारांनी ठाकरे गट सोडल्यानंतर विविध कारणे सांगितले. मतदार संघातील विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याचे प्रमुख कारण होते. यासोबतच पक्षाकडून पाठबळ मिळत नसल्याचाही आरोप होता. यादरम्यान खासदारांसोबतच 43 जण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेले होते. यात रामदार आठवले, विनोद तावडे यासारख्या नेत्यांचाही समावेश होता.

आता नुकताच या भेटीबद्दल मोठी बातमी पुढे येतंय. इनसाईट बातमी tv9 मराठीच्या हाती लागलीये. शिवसेनेच्या सात खासदारांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र संवाद साधला. मतदारसंघातील काम मार्गी लावण्यासाठी सत्तेचा उपयोग करा, असे नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे शिंदेंच्या खासदारांना म्हटले. कुठलीही विकासकामे असतील तरी थेट पंतप्रधान कार्यालयाशी संवाद साधा, असेही त्यांना स्पष्ट सांगण्यात आले.

विशेष म्हणजे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना शिंदे गटाच्या प्रत्येक खासदाराची स्वतंत्र विचारपूसही केली.  धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या योगाभ्यासाबद्दल मोदींनी माहिती जाणून घेतली, असल्याची माहिती सूत्रांनी दिली. थेट मोठे पाठबळ नरेंद्र मोदी यांनी फुटीर खासदारांना दिले. सत्तेचा वापर कामे करण्यासाठी करा, असेही त्यांनी म्हटले. 6 फुटीर खासदारांसोबत खासदार श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते. यावेळी ओमराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मतदारसंघातील विकास कामासंदर्भातील एक निवेदनही दिलं.

लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत. या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदेंच्या शिवसेनेला काही मंत्रिपदे मिळणार असल्याचे सांगितले जाते. संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, संजय दिना पाटील, भाऊसाहेब वाकचाैरे या खासदारांनी ठाकरे गटातून बंडखोरी करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकर यांना मंत्रिपद मिळण्याची चर्चा आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी