पंतप्रधान मोदींनी घेतले तिरुपती बालाजीचे दर्शन, पाहा देवाकडे काय मागितले

PM Visit Tirumala Temple : पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री उशिरा तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी तिरुमाला येथे दाखल झाले. तेलंगणामध्ये निवडणूक प्रचाराच्या आधी त्यांनी बालाजीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवाला साकडे ही घातले. पंतप्रधान मोदी तेलंगणामध्ये जाहीर सभा घेणार आहे. तसेच रोड शो देखील करणार आहेत.

पंतप्रधान मोदींनी घेतले तिरुपती बालाजीचे दर्शन, पाहा देवाकडे काय मागितले
modi visit Tirupati
Follow us
| Updated on: Nov 27, 2023 | 1:45 PM

तिरुमाला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे बालाजीचे दर्शन घेतले. यावेळी राज्याचे राज्यपाल एस. अब्दुल नजीर आणि मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी मोदींचे स्वागत केले. पंतप्रधानांनी तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर मंदिरात जाऊन पूजा केली. पीएम नरेंद्र मोदी यांनी तिरूमला येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात १४० कोटी भारतीयांच्या चांगल्या आरोग्यासाठी, कल्याणासाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली.

पीएम मोदी तीन दिवसाच्या तेलंगणा दौऱ्यावर आहेत. यावेळी ते निवडणूक प्रचारादरम्यान सभेला संबोधित करणार आहेत. महबूबाबाद आणि करीमनगर येथे पंतप्रधान मोदी जाहीर सभा घेणार आहेत.

प्रत्येक कोपऱ्यात कडक सुरक्षा व्यवस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनानिमित्त तिरुमलाच्या मार्गावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. रेनिगुंटा विमानतळ ते तिरुमला टेकडीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर ठिकठिकाणी चौक्या उभारण्यात आल्या आहेत. प्रत्येक कोपऱ्यात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारेही कडक नजर ठेवण्यात आली होती.

हैदराबादमध्ये पंतप्रधानांचा मेगा रोड शो

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हैदराबादमध्ये रोड शो देखील होणार आहे. ज्यामध्ये हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. निवडणुकीच्या काळात पीएम मोदी शक्तीप्रदर्शन करणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान दिल्लीला रवाना होतील.

30 नोव्हेंबर रोजी मतदान

तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 119 जागांच्या विधानसभेत काँग्रेस, बीआरएस, भाजप आणि एआयएमआयएम अशी चौरंगी लढत होत आहे. 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असून 3 डिसेंबरलाच निकाल जाहीर होणार आहे. राज्यातील सत्ता काबीज करण्यासाठी सर्वच पक्ष जोरदार प्रचार करत आहेत.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.