VIDEO: लखीमपूर हिंसा, हातात झाडू घेऊन गेस्ट हाऊसची साफसफाई; प्रियंका गांधींची गांधीगिरी

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या प्रियंका गाधी या लखीमपूरकडे निघाल्या होत्या. मात्र, पोलिसांनी त्यांना हरगावमध्येच ताब्यात घेतलं आहे. (Priyanaka Gandhi)

VIDEO: लखीमपूर हिंसा, हातात झाडू घेऊन गेस्ट हाऊसची साफसफाई; प्रियंका गांधींची गांधीगिरी
Priyanka Gandhi
Follow us
| Updated on: Oct 04, 2021 | 1:00 PM

लखनऊ: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या प्रियंका गाधी या लखीमपूरकडे निघाल्या होत्या. मात्र, पोलिसांनी त्यांना हरगावमध्येच ताब्यात घेतलं आहे. त्यांना सीतापूरच्या एका गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आलं आहे. प्रियंका गांधी यांनीही या गेस्ट हाऊसमध्ये गांधीगिरी करत गेस्ट हाऊसमध्ये साफसफाई केली आहे. हातात झाडू घेऊन गेस्ट हाऊसची साफसफाई करतानाच प्रियंका यांचा फोटोही व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे.

45 सेकंदाचा व्हिडीओ

प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सीतापूर येथील एका गेस्ट हाऊसमध्ये ठेवले आहे. या गेस्ट हाऊसमध्ये हातात झाडू घेऊन साफसफाई करतानाच प्रियंका गांधी यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 45 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत प्रियंका गांधी एकट्याच दिसत आहे. संपूर्ण रुमखाली आहे. त्या या रुममध्ये झाडू मारताना दिसत आहेत. प्रियंका यांना पीएसीच्या 22 व्या बटालियनच्या गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आलं आहे.

प्रियंका ते तुला घाबरले आहेत

प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे. प्रियंका, मला माहीत आहे तू मागे हटणार नाहीस. तुझ्या हिंमतीमुळे ते तुला घाबरले आहेत. न्यायाच्या या अहिंसक लढाईत आपण देशातील अन्नदात्याला विजय मिळवून देऊच, असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

सकाळी सकाळीच ताब्यात

लखीमपूर हिंसेच्या घटनेनंतर प्रियंका गांधी या रात्री उशिरा लखनऊला पोहोचल्या. त्या लखनऊ येथील त्यांच्या घरी आल्यावर त्यांच्या घराबाहेर 300 हून अधिक पोलीस कर्मचारी आणि 150 महिला कॉन्स्टेबल तैनात करण्यात आले होते. रात्री 12 वाजता प्रियंका या लखऊनवरून लखीमपूरसाठी निघाल्या. तब्बल पाच तास प्रवास केल्यानंतर त्या लखीमपूरला पोहोचल्या. मात्र, पोलिसांनी त्यांना हरगावमध्ये ताब्यात घेऊन सीतापूरच्या गेस्ट हाऊसमध्ये ठेवलं.

लखीमपूरमध्ये नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशाच्या लखीमपूर खीरीमध्ये राज्यातील मंत्र्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु होतं, ज्या आंदोलनात 2 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. रविवारी राज्यातील विकासकामाच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि केंद्रिय मंत्री अजय मिश्र आले होते. त्यांना विकासकामाचं उद्घाटन केल्यानंतर एका कार्यक्रमासाठी बनवीरपूर गावात जायचं होतं. दरम्यान, इथं मंत्री येणार असल्याने कृषी कायद्याला विरोध करणारे शेतकरी इथं एकत्र झाले, आणि काळे झेंडे घेऊन ते तुकुनिया परिसरात पोहचले. दरम्यान, यावेळी मंत्र्याच्या जाणाऱ्या गाड्यांच्या स्वॉर्डने विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडलं. केंद्रीय मंत्री अजय मिश्र यांचा मुलगा अभय मिश्रने हे कृत्य केल्याचा गंभीर आरोप, घटनास्थळी असेलल्या शेतकऱ्यांनी केला आहे. या दुर्घटनेत 2 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला, संतापलेल्या शेतकऱ्यांनी 3 गाड्या जाळून टाकल्या, यूपीत हिंसाचार उफाळला, ज्यात आतापर्यंत 8 लोक मृत्यूमुखी पडल्याची माहिती आहे.

संबंधित बातम्या:

Lakhimpur Kheri Violence : “अंगाला हात तर लावून दाखवा”, प्रियंका गांधी यूपी पोलिसांवर कडाडल्या, यूपी पोलिसांनाच दिले कायद्याचे धडे

Priyanka Gandhi : काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी उ. प्रदेश पोलिसांच्या ताब्यात

इकडं चर्चा स्टारकिडच्या ड्रग्जकांडाची, तिकडे केंद्रीय मंत्रीपुत्राची, 8 जणांचा मृत्यू, 4 शेतकरी

(Priyanka Gandhi Sweeps Room Where Cops Detained Her)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.