प्रियांका गांधी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात, वायनाडमधून पोटनिवडणूक लढवणार

खासदार राहुल गांधी यांनी वायनाडमधून आपल्या खासदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. ते रायबरेलीतून खासदार म्हणून काम करणार आहेत. त्यांनी वायनाड आणि रायबरेली अशा दोन्ही ठिकाणाहून निवडणूक लढवली होती.

प्रियांका गांधी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात, वायनाडमधून पोटनिवडणूक लढवणार
Follow us
| Updated on: Jun 17, 2024 | 7:48 PM

राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड मतदारसंघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी हे रायबरेली मतदारसंघातूनच खासदार राहणार आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी ही माहिती दिली. प्रियांका गांधी वायनाडमधून पोटनिवडणूक लढवणार आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेलीमधून विजय मिळवलाय. विजयानंतर त्यांनी वायनाडमधून राजीनामा देण्याचे संकेत दिले होते. गेल्या आठवड्यात त्यांनी लोकसभा सचिवालयाकडून कलम 240 (1) अंतर्गत राजीनामा देण्याच्या प्रक्रियेबाबत माहिती मागवली होती.

राहुल गांधी यांच्या राजीनाम्यापूर्वीच ते यूपीला प्राधान्य देतील, अशी अपेक्षा होती. रायबरेली हे त्यांच्या कुटुंबाचे पारंपारिक मतदारसंघ राहिला आहे. या जागेवरून सोनिया गांधी आणि इंदिरा गांधीही खासदार झाल्या आहेत.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वायनाडमधून सीपीआयच्या एनी राजा यांचा 3 लाख 64 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. रायबरेलीमधूनही ते साडेतीन लाख मतांनी विजयी झाले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी अमेठी आणि वायनाडमधून निवडणूक लढवली होती. मात्र अमेठीमध्ये त्यांचा पराभव झाला होता. पण वायनाडमध्ये 4.31 मतांनी विजयी झाला होता.

2019 च्या निवडणुकीत त्यांनी पीपी सनीर यांचा पराभव केला. 2009 मध्येही वायनाड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे एमआय शानवास विजयी झाले होते. आता या जागेवर प्रियांका गांधी पोटनिवडणूक लढवणार आहेत. रायबरेली लोकसभा मतदारसंघात राहुल गांधींचा विजय हा यूपीमध्ये काँग्रेसचे पुनरागमन मानला जात आहे. या निवडणुकीत काँग्रेसने रायबरेली, अमेठी, सीतापूर, सहारनपूर, अलाहाबाद आणि बाराबंकीसह उत्तर प्रदेशातील 6 जागा जिंकल्या. अमेठीमध्ये काँग्रेस उमेदवार किशोरी लाल यांचा 167196 मतांनी पराभव झाला. रायबरेली आणि अमेठी ही गांधी कुटुंबाची कौटुंबिक जागा आहेत.

Non Stop LIVE Update
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'.
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्..
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्...
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव.
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की..
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की...
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह.
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज.
''माझ्या बापाविषयी बोलाल तर...'', थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना दम
''माझ्या बापाविषयी बोलाल तर...'', थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना दम.
रात्रीस खेळ चाले, शिंदे-फडणवीस-राज ठाकरेंमध्ये मध्यरात्री गुप्त बैठक
रात्रीस खेळ चाले, शिंदे-फडणवीस-राज ठाकरेंमध्ये मध्यरात्री गुप्त बैठक.
शरद पवार गटाचे 33 नावं फिक्स, कोणाला उमेदवारी? सूत्रांची माहिती काय?
शरद पवार गटाचे 33 नावं फिक्स, कोणाला उमेदवारी? सूत्रांची माहिती काय?.