AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हेरगिरीच्या आरोपाखाली आणखी एक youtuber ला अटक, 3 वेळा पाकची वारी; ज्योती मल्होत्राशी कनेक्शन

पंजाबमध्ये पोलिसांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या आणखी एका हेराला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपी जसबीर सिंगवर कारवाई करत त्याला बेड्या ठोकल्या. हरियाणामधून अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या तो संपर्कात होता. एवढंत नव्हे तर पाकिस्तान दूतावासातील कर्मचारी दानिशच्या निमंत्रणावरून पाकिस्तान राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमातही तो सहभागी झाला होता.

हेरगिरीच्या आरोपाखाली आणखी एक youtuber ला अटक, 3 वेळा पाकची वारी; ज्योती मल्होत्राशी कनेक्शन
आणखी एका हेराला अटकImage Credit source: social media
| Updated on: Jun 04, 2025 | 2:32 PM
Share

पहलगाम मधील दहशतवादी हल्ला आणि ऑपोरेशन सिंदूरनंतर भारता सरकार प्रचंड अवर्ट असून देशातील दहशतवादी नेटवर्क आणि त्यांच्या स्रोतांवर सतत कठोर कारवाई करत आहे. तसेच भारतात राहणाऱ्या आणि पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या लोकांवर कारवाई केली जात आहे. पंजाब पोलिसांनी आता रूपनगर येथून जसबीर सिंग नावाच्या युट्यूबरला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केली आहे.

गेल्या काही काळात पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अनेक भारतीयांना अटक करण्यात आली आहे. यूट्यूबर ज्योति मल्होत्रासंह अनेकांवर कारवाई केली असतानाच आता पंजाबमधून आणखी एक हेराला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पंजाबमधील मोहाली येथील एका युट्यूबरला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. जसबीर सिंगने तीन वेळा पाकिस्तानला भेट दिल्याचेही समोर आलं आहे.

पाकिस्तानी हेरगिरी नेटवर्कमध्ये सहभागी असल्याच्या आरोपाखाली, पंजाबमधील रूपनगर येथे राहणारा युट्यूबर जसबीर सिंग याला मंगळवारी मोहाली येथून अटक करण्यात आली. मोहालीच्या स्टेट स्पेशल ऑपरेशन्स सेल (SSOC) ने या नेटवर्कचा पर्दाफाश केला.

मिळालेल्या माहितीनुसार, जसबीर सिंह हा “जान महल” नावाचं यूट्यूब चॅनेल चालवतो. एवढंच नव्हे तर हरियाणामधून अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या संपर्कातही तो होता. जसबीर सिंग पाकिस्तान गुप्तचर संस्थेचे गुप्तचर अधिकारी शाकीर यांच्या संपर्कात होता अशी माहितीही समोर आली आहे. तो तब्बल 3 वेळा (2020, 2012, 2024 ) पाकिस्तानला गेला होता. त्याच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचीही झडती घेण्यात आली आहे. त्याच्या मोबाईलमधून पाकिस्तानमधील अनेक नंबर सापडले आहेत.

PAK नॅशनल डे कार्यक्रमात सामिल

पाकिस्तान दूतावासातील कर्मचारी दानिश यांच्या निमंत्रणावरून दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासात आयोजित पाकिस्तान राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमात देखील जसबीर सिंग सहभागी झाला होता. पंजाबच्या डीजीपींनी याबद्दल सोशल मीडिया हँडल एक्सवर पोस्ट केली आहे. “त्वरीत कारवाई करत, राज्य विशेष ऑपरेशन्स सेल मोहालीने रूपनगरमधील महालन गावातील रहिवासी जसबीर सिंगशी संबंधित हेरगिरी नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे.” असे त्यांनी त्यात नमूद केलं.

पोलिसांकडून माहिती समोर

सिंग “जान महल” नावाचा एक यूट्यूब चॅनल चालवतो. तो दहशतवाद समर्थित हेरगिरी नेटवर्कचा भाग असलेल्या पीआयओ शाकीर उर्फ ​​जट्ट रंधावाशीही जोडला गेला आहे, असे पोस्टमध्ये लिहीण्यात आलं होतं. हरियाणातील हेर ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर, जसबीरने स्वतःला वाचवण्यासाठी या पीआयओंशी झालेल्या संभाषणाचे सर्व पुरावे पुसून टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता जसबीरविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

भारतात राहून पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या अनेकांना यापूर्वीही अटक करण्यात आली आहे. मंगळवारी पंजाब पोलिस आणि काउंटर इंटेलिजेंसने पंजाबच्या तरनतारन भागातून गगनदीप सिंग उर्फ ​​गगनला अटक केली. तसेच पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप असलेल्या शकूर खानलाही मंगळवारी अटक करण्यात आली. आरोपी हा राजस्थानमधील जैसलमेरचा रहिवासी आहे. यापूर्वी, हरियाणा आणि पंजाब पोलिसांनी हिसार येथील ट्रॅव्हल व्लॉगर आणि युट्यूबर ज्योती मल्होत्रा ​​आणि कैथलमधील मस्तगढ गावातील देवेंद्र सिंग (२५) यांना पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती.

...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.