AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India Qatar Realtions | मृत्यूदंडाची शिक्षा होऊनही भारतात परतले माजी नौसैनिक, मायभूमीवर पाऊल ठेवताच म्हणाले, हे फक्त…

India Qatar Realtions | कतारमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या माजी नौसैनिकांना सोडवून आणण सोप नव्हतं. पण भारत सरकारने हे अशक्य वाटणार काम करुन दाखवलय. दाहरा ग्लोबल कंपनीसाठी हे नौसैनिक काम करत होते. त्यांच्यावर हेरगिरीचा गंभीर आरोप होता.

India Qatar Realtions | मृत्यूदंडाची शिक्षा होऊनही भारतात परतले माजी नौसैनिक, मायभूमीवर पाऊल ठेवताच म्हणाले, हे फक्त...
qatar released 8 ex indian navy servicemen
| Updated on: Feb 12, 2024 | 11:52 AM
Share

India Qatar Realtions | भारताचा आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा कूटनीतिक विजय झाला आहे. हेरगिरीच्या गंभीर आरोपाखाली भारताचे माजी आठ नौसैनिक कतारच्या तुरुंगात बंद होते. त्यांची आता सुटका झाली आहे. यातले सात नौसैनिक मायदेशी परतले आहेत. कतारहून भारतात दाखल झालेल्या या माजी नौसैनिकांनी मायभूमीवर पाऊल टाकताच ‘भारत माता की जय’चे नारे दिले. कतारहून भारतात आलेल्या भारताच्या या माजी नौसैनिकाने सांगितलं की, “पीएम मोदींच्या हस्तक्षेपाशिवाय हे शक्य नव्हतं. भारत सरकारने सतत आमच्या सुटकेसाठी प्रयत्न केले” ‘आम्ही 18 महिने प्रतिक्षा केली’ असं दुसऱ्या नौसैनिकाने सांगितलं.

“आम्ही पीएम मोदी यांचे आभारी आहोत. त्यांचा व्यक्तीगत हस्तक्षेप आणि कतारसोबतच्या समीकरणाशिवाय हे शक्य नव्हतं. भारत सरकारने जे प्रयत्न केले, त्या बद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. त्या प्रयत्नाशिवाय आजचा दिवस पाहता आला नसता” असं हा माजी नौदल अधिकारी म्हणाला. दाहरा ग्लोबल कंपनीसाठी काम करणाऱ्या आठ भारतीय नागरिकांच्या सुटकेच भारत सरकारने स्वागत केलय. आठ पैकी सात जण भारतात परतले आहेत. कतारचे राजे अमीर यांच्या निर्णयाच आम्ही स्वागत करतो, असं भारत सरकारने म्हटलय.

डिसेंबर महिन्यात शिक्षेत बदल

मागच्यावर्षी डिसेंबर महिन्यात कतारच्या एका कोर्टाने अल दहरा ग्लोबल प्रकरणात अटकेत असलेल्या भारतीय नागरिकांची मृत्यूदंडाची शिक्षा बदलली होती. ही शिक्षा तुरुंगवासात बदलली होती. भारत सरकारने मृत्यूदंडाच्या शिक्षेविरोधात कतारच्या कोर्टात अपील केलं होतं. ते मान्य करण्यात आल्यानंतर हा निर्णय झाला होता.

कतारच्या ताब्यात कुठले भारतीय अधिकारी होते?

कॅप्टन नवतेज सिंह गिल, कॅप्टन बीरेंद्र कुमार वर्मा, कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कमांडर अमित नागपाल, कमांडर पूर्णेंदु तिवारी, कमांडर सुगुनाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता आणि नाविक रागेश हे आठ जण कतारच्या ताब्यात होते.

Follow Us
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ