मृत्यूपूर्वीच अंत्यसंस्काराची जागा बुक करण्यासाठी या स्मशान भूमीत लागतात रांगा, कारण ऐकून बसेल धक्का
हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल की, काही लोक मृत्यूपूर्वीच आपल्या अंत्यसंस्काराची तयारी करत आहेत. ते मृत्यू होण्यापूर्वीच आपल्या अंत्यसंस्कारासाठी लागणारी जागा बुक करत आहेत.

हे सर्वांना माहिती आहे की, मृत्यूनंतर आपल्याला एकतर जमिनीमध्ये दफन केलं जाईल किंवा जाळलं जाईल, थोडक्यात कुठल्यातरी प्रकारे मृत शरिरावर अंत्यसंस्कार होणारच आहेत. मात्र हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल की, काही लोक मृत्यूपूर्वीच आपल्या अंत्यसंस्काराची तयारी करत आहेत. ते आपला मृत्यू होण्यापूर्वीच आपल्या अंत्यसंस्कारासाठी लागणारी जागा बुक करत आहेत. अशीच एक धक्कादायक बातमी उत्तर प्रदेशच्या गोरखपूर जिल्ह्यातून समोर आली आहे. इथे अशी एक स्मशान भूमी आहे जिथे जिंवत लोक मरण्यापूर्वीच आपल्या अंत्यसंस्कारासाठी लागणारी जागा बुक करत आहेत, आणि ते त्यांच्या कुटुंबाला देखील सांगत आहेत, की माझा अंत्यसंस्कार याच जागेवर करा.
गोरखपूरमध्ये राहणाऱ्या ख्रिश्चन समुदायामधून ही बातमी समोर आली आहे, गोरखपूरमधील पडले गंज या ठिकाणी एक ख्रिश्चन स्मशानभूमी आहे. ख्रिश्चन समुदायातील लोकांना मृत्यूनंतर इथे दफन केले जाते. मात्र आता इथे धक्कादायक प्रकार समोर आला आहे, तो म्हणजे अनेक जण आपल्या मृत्यूपूर्वीच या स्मशान भूमीत आपल्यासाठी जागा बुक करत आहेत. या जागेचे जे केअर टेकर आहेत, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या स्मशानभूमीत अनेक जण आपल्या मृत्यूपूर्वीच इथे जागा बुक करत आहेत. त्यामागचं कारण म्हणजे जे इथे जागा बुक करण्यासाठी येतात, त्यांच्या प्रियजणांचा किंवा नातेवाईकांचा मृत्यू झालेला असतो, त्यांना देखील याच स्मशान भूमीत दफन केलेलं असतं, आणि जे जागा बुक करण्यासाठी येतात, त्यांची अशी इच्छा असते की त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांचा दफन विधी देखील त्याच जागेच्या शेजारी व्हावा, जिथे त्यांच्या प्रिय नातेवाईकांचा दफनविधी झालेला असतो, त्यामुळे येथील लोक आपल्या मृत्यूपूर्वीच आपल्या दफनविधीसाठी जागा बुक करतात.
दरम्यान यावर बोलताना ख्रिश्चन समुदायातील जॉर्ज यांनी सांगितलं की ही काही पहिली वेळ नाहीये, यापूर्वी देखील अनेकदा ख्रिश्चन समुदायामध्ये असा प्रकार पाहायला मिळाला आहे, हे लोक आपल्या दफनविधीसाठी अशी जागा बुक करतात, जिथे त्यांच्या पत्नीचा किंवा इतर प्रियजणांचा मृत्यूनंतर दफनवीधी झालेला असतो.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
