मोदी सरकारकडून जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनांना केराची टोपली, राहुल गांधींचा गंभीर आरोप

काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत (Rahul Gandhi on WHO Corona Guidelines).

मोदी सरकारकडून जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनांना केराची टोपली, राहुल गांधींचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत (Rahul Gandhi on WHO Corona Guidelines). जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी जगभरातील देशांना काही महत्त्वाच्या सुचना दिल्या आहेत. त्या भारतात मोदी सरकारने का पाळल्या नाही? असा प्रश्न राहुल गांधींनी विचारला. तसेच कुणाच्या सांगण्यावरुन हा गुन्हेगारी स्वरुपाचा कट रचला? असाही प्रश्न राहुल गांधींनी विचारला. त्यांनी ट्विटर करत आपलं मत व्यक्त केलं.

राहुल गांधी म्हणाले, ”आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या सुचनांप्रमाणे भारतात कोरोना नियंत्रणासाठी व्हेंटिलेटर आणि सर्जिकल मास्क पुरेशा प्रमाणात साठवून ठेवण्यास सांगण्यात आलं आहे. त्यासाठी या वस्तूंची निर्यात बंद करण्यास सांगितलं आहे. असं असतानाही भारत सरकारने 19 मार्चपर्यंत या सर्व वस्तूंच्या निर्यातीला परवानगी का दिली? हा खेळ कोणत्या शक्तींच्या सांगण्यावरुन खेळला जात आहे? हा गुन्हेगारी स्वरुपाचा कट नाही का?”


राहुल गांधी यांनी आपल्या या ट्विटसोबत शोधपत्रिका करणाऱ्या कारवान या न्यूज पोर्टलचा एक अहवालही जोडला आहे. यात भारत सरकारकडून जागतिक आरोग्य संघटनेच्या सुचनांच्या उल्लंघनावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांनी याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रविवारी (22 मार्च) झालेल्या जनता कर्फ्यूच्या घोषणेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. कोरोना संसर्गावर नियंत्रण आणि त्यात जनतेची मदत करण्यासाठी टाळ्या वाजवून काहीही होणार नाही. जनतेसाठी आर्थिक पॅकेज, टॅक्स ब्रेक आणि कर्जफेडीला काही काळ स्थगिती द्या, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली होती.

राहुल गांधी म्हणाले होते, “कोरोना व्हायरस हा आपल्या नाजूक अर्थव्यवस्थेवर मोठा आघात आहे. याचा छोटे, मध्यम व्यवसायिक आणि रोजंदारीवर जगणाऱ्या मजूरांवर सर्वाधिक प्रभाव झाला आहे. रोजंदारी करणाऱ्या कामगारांच्या दैनंदिन गरजांचेही प्रश्न निर्माण झाले आहेत. टाळ्या वाजवून काहीही मदत मिळणार नाही. आज आर्थिक मदत, कर सवलत आणि कर्जफेडीला स्थगिती अशा एका मोठ्या पॅकेजची गरज आहे. यासाठी तात्काळ पावलं उचला.”

संबंधित बातम्या :

टाळ्या वाजवून काही होणार नाही, आर्थिक मदत, टॅक्स ब्रेक आणि कर्जफेडीला स्थगिती द्या : राहुल गांधी

कामगारांचे पगार कापू नका, व्यापारी आणि श्रीमंतांना पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन

संंबंधित व्हिडीओ:


Rahul Gandhi on WHO Corona Guidelines

Published On - 4:07 pm, Mon, 23 March 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI