AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

झारखंड विद्यार्थी आंदोलनावर राहुल गांधींचे मोठे विधान; म्हणाले, त्या आंदोलनात बळाचा वापर…

Rahul Gandhi : आज लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत झारखंडमधील आंदोलनावर भाष्य केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

झारखंड विद्यार्थी आंदोलनावर राहुल गांधींचे मोठे विधान; म्हणाले, त्या आंदोलनात बळाचा वापर...
Rahul gandhi on Jharkhand Student ProtestImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 10, 2026 | 6:33 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून झारखंडमधील विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. स्पर्धा परीक्षांमध्ये म्हणजे JPSC आणि JSSC परीक्षांमध्ये कथित अनियमितता, पेपरफुटी, गैरप्रकार आणि निवड प्रक्रियेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवला जात आहे. परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करावी आणि या प्रकरणांची CBI चौकशी करावी, या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. अशातच आज लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत या आंदोलनावर भाष्य केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनावर भाष्य

राहुल गांधी यांनी आजच्या पत्रकार परिषदेत झारखंडमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या बळाच्या वापराला चुकीचे म्हटले आहे. विद्यार्थ्यांना शांततापूर्ण पद्धतीने आपले म्हणणे मांडण्याचा आणि आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यांच्या समस्यांचे निराकरण चर्चेच्या माध्यमातूनच केले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना त्यांनी झारखंड सरकारला आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेण्याचे आणि त्यांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्याचे आवाहन केले.

अमित शहांनी राजीनामा द्यावा – राहुल गांधी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या संसदेत भाषण करणार आहेत. यावर बोलताना राहुल गांधी यांनी म्हटले की, ‘विरोधकांना गृहमंत्र्यांचे कोणतेही सामान्य भाषण ऐकण्यात रस नाही. 20 जुलै रोजी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, खिळे लावलेल्या काठ्या आणि पेलेट गनचा वापर करण्याचे आदेश नेमके कोणी दिले, हे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले पाहिजे. जर अमित शाह यांनी हे आदेश दिले असतील तर ते दोषी आहेत आणि जर त्यांना याबाबत माहितीच नसेल, तर ते अक्षम आहेत. दोन्ही परिस्थितींमध्ये त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.’

आजच संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेला हिंसाचार आणि पोलिसांच्या कारवाईवर चर्चा करण्यास तयार असल्याचे म्हटले होते. गृहमंत्री अमित शाह यावर सभागृहात बोलणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यानंतर आत इंदिरा भवन येथे पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

Follow Us
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...