AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Gandhi : राहुल गांधी अडचणीत? शुद्धीकरण यज्ञावरून वाद पेटला; पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल, नेमकं कारण काय?

राहुल गांधी अडचणीत सापडलल्याची चर्चा आहे. हल्दानी प्रकरणावरून केलेल्या विधानावरून राहुल गांंधींच्या विरोधातच FIR दाखल झाल्याचे समोर आलं आहे.

Rahul Gandhi : राहुल गांधी अडचणीत? शुद्धीकरण यज्ञावरून वाद पेटला; पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल, नेमकं कारण काय?
rahul gandhi newsImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Aug 31, 2026 | 7:34 AM
Share

लोकसभेचे विरोधी पक्षनेते, काँग्रेस खासदार राहुल गांधी अडचणीत सापडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राहुल गांधींच्या विरोधातच उत्तराखंडच्या हल्दानी पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल झाली आहे. अमित कुमार नावाच्या तरुणाच्या तक्रारीवरून राहुल गांधींच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. अनुसूचित वर्गाच्या भावना दुखावल्याचा आरोप करत अमित कुमारने राहुल गांधींच्या विरोधात तक्रार दाखल केली. राहुल गांधींच्या विरोधात एफआयआर दाखल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

राहुल गांधींच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 196 आणि 299 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तसेच तक्रारीत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायदा, 1989 च्या कलम (1) अंतर्गत समावेश करण्यात आला आहे. काँग्रेसच्या सभेनंतर हल्दानीत शुद्धीकरण यज्ञ केल्याची टिप्पणी राहुल गांधी यांनी केली होती. गांधींनी हा विधी दलितविरोधी असल्याचा आरोप केला होता. परंतु राहुल गांधींच्या वक्तव्यावरून अनुसूचित जातींच्या भावना दुखावल्याचा दावा अमित कुमार याने केला आहे.

काय आहे प्रकरण?

हल्दानीत 8 ऑगस्ट रोजी काँग्रेसची रॅली झाली. यानंतर एका हिंदू संघटनेने रामलीला मैदानावर शुद्धीकरणासाठी यज्ञ केल्याचा आरोप आहे. परंतु रामलीला मैदानातील अस्वच्छता आणि कथित घोषणांच्या विरोधात शुद्धीकरण यज्ञ केल्याचा हिंदू संघटनेचा दावा आहे. मात्र, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या शुद्धीकरण यज्ञाला दलितविरोधी असल्याचे म्हटलं होतं. त्यानंतर त्यांनी या विधीचा उघडपणे विरोध केला होता. खरगे यांच्या आरोपाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

राहुल गांधींवर FIR दाखल होताच पोलिसांकडून तपास सुरू

मल्लिकार्जुन खरगे यांच्या विरोधानंतर राहुल गांधी यांनी शुद्धीकरण यज्ञाला दलितविरोधी म्हणत भाजप आणि आरएसएसवर जोरदार निशाणा साधला होता. राहुल गांधी यांच्या विधानाचा संदर्भ घेत अमित कुमारने हल्दानी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारदार अमित कुमार याने राहुल गांधींवर अनुसूचित जातींच्या समाजाच्या भावना दुखावल्याचा खळबळजनक आरोप केलाय. यावरुन पोलिसांनी राहुल गांधी यांच्या विरोधात एफआयआर दाखल केली. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Follow Us
श्रीरामपुरातील अशोक बँकेवर RBIचे निर्बध, मात्र परवाना कायम
Shrirampur : श्रीरामपुरातील अशोक बँकेवर RBIचे निर्बध, मात्र परवाना कायम
'पक्षात बाहेरुन सरदार आले आणि मंत्री झाले'-सदाभाऊ खोत
Sadabhau Khot : 'पक्षात बाहेरुन सरदार आले आणि मंत्री झाले', मंत्रीपद न मिळाल्याने सदाभाऊ खोतांकडून खदखद व्यक्त
24 तासात योग्य तो निर्णय घेऊ- उदय सामंत
Uday Samant On Manoj Jarange Protest : 24 तासात योग्य तो निर्णय घेऊ- उदय सामंत
प्रसंगावधान राखत बस कर्मचाऱ्याने वाचवले वृद्ध प्रवाशाचे प्राण
केरळमध्ये बस कर्मचाऱ्याच्या तत्परतेमुळे वृद्ध प्रवासी पडण्यापासून वाचले
महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये मेडलवरून वाद; पालकांकडून अधिकाऱ्यांना घेराव
ठाणे मॅरेथॉन: विजेत्यांना मेडल न मिळाल्याने पालकांचा गोंधळ
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवारांचाच -सुप्रिया सुळे
Supriya Sule : चुकीच्या पद्धतीने काढून घेतलेला राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांना परत करा: सुप्रिया सुळे
पैठणीसाठी आता बारकोड, वस्त्रोद्योग मंत्र्यांची माहिती
Paithani Saree : पैठणी साडीसाठी आता बारकोड: वस्त्रोद्योग मंत्र्यांनी दिली माहिती, फसवणूक थांबणार
संजय जाधवांच्या पक्ष प्रवेशाबबात पुन्हा शिंदेंचं सुचक वक्तव्य, म्हणाले
संजय जाधवांच्या पक्ष प्रवेशाबबात पुन्हा शिंदेंचं सुचक वक्तव्य, म्हणाले...
सुप्रिया सुळेच्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा खोचक टोला; म्हणाले...
सुप्रिया सुळेच्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा खोचक टोला; म्हणाले, फोडण्यासाठी पक्षच...
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये हायड्रो पॉवर बोगद्यात कामगार अडकले
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये हायड्रो पॉवर बोगद्यात कामगार अडकले, बचावकार्य सुरु