राहुल गांधींची मोठी घोषणा! थेट दिल्लीच्या जंतरमंतरवर…ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आता आरपारची लढाई!
ज्ञानेश कुमारांना राजीनामा द्यावाच लागणार, असं म्हणत आता दिल्लीमध्ये पुन्हा एकदा निवडणूक आयोगाच्या विरोधात वातावरण तापलं आहे. जंतर मंतरवर आता आम्ही आंदोलनाला जात आहोत, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावाच लागेल. जंतरमंतरवर जात आहोत सर्व इंडिया आघाडीचे कार्यकर्ते जमले असून आम्ही जंतरमंतरवर आता आंदोलनाला पुन्हाला बसणार आहोत. सगळ्यांनी जंतरमंतरला यावं, अंस राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. आम्हाला काल सांगितलं गेलं की तुम्ही याठिकाणी आंदोलन नाही करु शकत, त्यामुळे आम्ही आता जंतरमंतरवर आंदोलनासाठी जात असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं आहे.
काल रात्री उशीरापर्यंत दिल्लीमध्ये मोठ्या घडामोडी घडत होत्या. पण आज सकाळी पुन्हा एकदा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांनी त्यांचा मोर्चा उघडला आहे. आता आरपारची लढाई करणार असल्याचं म्हणत राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात जंतर मंतरवर आंदोलनाला जात असल्याचं जाहीर केलं आहे. ६ ऑक्टोबर रोजी राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि इतर सर्व इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या मुख्य कार्यलयावर धडकण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांना पोलिसांनी अडवून ठेवलं.
तीन बसमधून इंडिया आघाडीचे खासदार जंतरमंतरकडे निघाले
दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दिल्लीतल्या एका हॉटेलमध्ये विरोधी पक्षाची बैठक पार पडली. याठिकाणी सर्व खासदारांनी हजेरी लावली. इथे दुपारच्या जेवणादरम्यान चर्चा झाली आणि आता पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा निर्णय झाल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं आहे. आता जवळापास तीन बस दाखल झालेल्या असून या सर्व बसमध्ये बसून हे खासदार जंतमंतरवर पोहोचणार असून तिथं आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. त्यांनी म्हटलं की माझ्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. माझ्यावर १०० गुन्हे दाखल झाले तरी काही समस्या नाही. हे सगळे गुन्हे म्हणजे माझ्यासाठी मेडल आहेत, असं म्हणत आता आम्ही जंतरमंतरवर आंदोलन करु, पण निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांचा राजीनामा घेणारच, असा आक्रमक पवित्रा राहुल गांधींनी घेतला आहे.
आकाशवाणी भवन परिसरात ८ ते ९ तासा इंडिया आघाडीचे नेते बसून ठिय्या देत होते., ज्यामध्ये राहुल गांधी यांचाही समावेश होता. जोपर्यंत निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार राजीनामा देणार नाहीत, तोपर्यंत आपण मागे हटणार नाही, अशी भूमिका घेतेलेली होती. त्यानंतर रात्री ९ नंतर पोलिसांनी या सर्व नेत्यांना उचललं होतं. तीन बसमध्ये टाकत त्यांना आकाशवाणी भवन परिसरातून हलवलं होतं.
