AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Gandhi : न्यायाच्या दिशेने हे पहिलं पाऊल .. पॅलेट गन प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात पॅलेट गनमुळे जखमी झालेल्या पीडिताला न्याय मिळवून देण्यासाठी राहुल गांधी संसद मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी अनेक तास ठिय्या दिल्यानंतर, अखेर पोलिसांनी एफआयआर नोंदवली. हे न्यायाचं पहिले पाऊल आहे, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी यावेळी दिली.

Rahul Gandhi : न्यायाच्या दिशेने हे पहिलं पाऊल .. पॅलेट गन प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
Rahul Gandhi
| Updated on: Aug 21, 2026 | 8:01 PM
Share

राजधानी दिल्लीतील जंतरमंतर येथील कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान पॅलेट गनचा वापर करण्यात आला होता. त्याची चौकशी सुरू आहे. याच पॅलेट गन पीडित तरुणाला घेऊन काँग्रेस नेते राहुल गांधी आज सकाळी संसद मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचले. गुन्हा दाखल करण्याची मागणी करत त्यांनी तिथे अनेक तास ठिय्याही दिला.  अखेर अनेक तासांनी पोलीस झुकले आणि तब्बल महिन्याभरानंतर याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आली केली.  यानंतर आता राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘ही तर फक्त सुरुवात आहे,  न्यायाच्या दिशेने हे पहिलं पाऊल आहे’, असं ते म्हणाले. तक्रार दाखल करायला 7 ते 8 तास लागले, पोलिसांना तक्रार दाखल करायची होती, पण वरून थांबवण्यात आलं असा आरोपही त्यांनी केला.

पॅलेट गन प्रकरणात एफआयआर दाखल झाल्यानंतर राहुल गांधी म्हणाले की, ‘ एका तरुणावर अन्याय झाला आहे. तो साडेअकरा वाजता आला होता आणि आता पावणेसात वाजले आहेत; आता कुठे एफआयआर दाखल झाली आहे. आम्हाला 8 तास लागले. जेव्हा दिल्लीत न्याय मिळत नाही, तेव्हा एखाद्या गावात किंवा छोट्या शहरातील पोलीस ठाण्यात काय परिस्थिती असेल, याचा विचार करा. आम्ही कोणतंही चुकीचं काम केलेलं नाही’, असं त्यांनी नमूद केलं.

न्यायासाठी 8 तास लागले

‘ आम्ही फक्त देशातील एका नागरिकासाठी आणि त्याच्या आई-वडिलांसाठी न्याय मागितला आणि त्यासाठी 8 तास लागले. अंतिम मंजुरी होम सेक्रेटरी आणि स्वतः अमित शाह यांच्याकडून घ्यावी लागली. त्यानंतरच एफआयआर दाखल होऊ शकली. यावरून समजू शकतं की एफआयआर कोण रोखत होतं. पोलीस अधिकारी एफआयआर नोंदवू इच्छित होते, पण त्यांना वरून रोखलं जात होतं’ असा आरोप त्यांनी केला.

काय आहे प्रकरण ?

साहिल लोहबच 20 जुलै रोजी आंदोलनादरम्यान कनॉट पॅलेसजवळ उपस्थित होता. मात्र या आंदोलनादरम्यान पॅलेट गनचा वापर करण्यात आला, असा आरोप साहिलने केला. त्याच्या शरीरात काही छर्रेही घुसले, एका गोळीचा छर्रा त्याच्या हृदयाजवळही लागला. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी हे आज दुपारपासूनच राहुल गांधी संसद मार्ग पोलीस ठाण्याच्या बाहेर ठाण मांडून बसले होते. त्यांच्यासोबतच पॅलेट गन पीडित साहिल, तसेच त्याच्या आई-वडिलांनीही पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या दिला होता. या आंदोलनात काँग्रेस नेत्या प्रियंका गांधीही सामील झाल्या. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात यावी अशी राहुल गांधी यांची मागणी होती,पण पोलिसांनी त्यास नकार दिला. मात्र राहुल गांधी हे त्यांच्या मागणीवर ठाम होते. अखेर अनेक तासांचं त्यांचं ठिय्या आंदोलन यशस्वी ठरलं आणि पोलिस झुकले, त्यांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला.

Follow Us
MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं...
Vivekanand Patil on Bhimanvar : MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं काय म्हणाले?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; पप्पू शिंदेने दिलेली अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुर...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुरांवर उपासमारीची वेळ
माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
Shivraj More : माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी...
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी संकटात
80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; शिवराज मोरे....
Shivraj More : 80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; MPSC कार्यकर्ता शिवराज मोरे यांचा खळबळजनक दावा
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन यांचा आरोपांनी खळबळ
याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे
Shivraj More : MPSC Students Protest : याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे यांचा पलटवार, नेमकं प्रकरण काय?
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार...
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार म्हणाले...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत... विद्यार्थिनींच्या संतापानंतर परिक्षाच रद्द