AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फास्ट बुकींग, आधार व्हेरिफिकेशन, चार्टचा नवीन नियम अन् भाडेवाढ…,आजपासून रेल्वेच्या नियमात बदल

पूर्वी ट्रेनने प्रवास करताना प्रवासाच्या ४ तास आधी आरक्षण चार्ट अपडेट होत होता. आता ८ तास आधी चार्ट तयार होणार आहे. तसेच भारतीय रेल्वेच्या प्रवासी भाड्यातही आजपासून वाढ होत आहे. ही भाडेवाढ मेल, एक्सप्रेस आणि सुपरफास्ट गाड्यांच्या विविध वर्गांमध्ये लागू होईल.

फास्ट बुकींग, आधार व्हेरिफिकेशन, चार्टचा नवीन नियम अन् भाडेवाढ...,आजपासून रेल्वेच्या नियमात बदल
| Updated on: Jul 01, 2025 | 7:32 AM
Share

भारतीय रेल्वेचे काही नियम आजपासून बदलत आहे. तसेच रेल्वेच्या भाड्यात वाढ होणार आहे. रेल्वेने प्रवाशांसाठी काही चांगले नियम तयार केले आहे. त्यानुसार आजपासून १ जुलैपासून ज्यांचे आयआरसीटीसी खाते आधारशी जोडलेले आहे किंवा आधारने पडताळणी झाली आहे, त्यांनाच तत्काळ तिकिटे बुक करता येणार आहे. आधार व्हेरिफिकेशन झालेले युजर आयआरसीटीसी वेबसाइट किंवा मोबाइल अ‍ॅपवरून तिकिटे बुक करू शकतील. तसेच जुलैच्या अखेरीस ओटीपी आधारित प्रणाली लागू केली जाणार आहे.

आता आठ तास आधी चार्ट

रेल्वेचे प्रतिक्षा यादीतील तिकीट असणाऱ्यांना चांगली बातमी आहे. पूर्वी ट्रेनने प्रवास करताना प्रवासाच्या ४ तास आधी आरक्षण चार्ट अपडेट केला जात होता. त्यामुळे तिकीट कन्फर्म झाले आहे की नाही हे शेवटच्या क्षणी कळत होते. परंतु आता वेटिंग तिकिटे असलेल्यांना त्यांचे तिकीट कन्फर्म झाले आहे की नाही हे ८ तास आधी कळणार आहे. रेल्वेचा चार्ट ८ तास आधी तयार करण्याच्या प्रस्तावाला रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. हा नवीन नियम टप्प्याटप्प्याने लागू करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. नवीन नियमानुसारच व्हीव्हीआयपी कोटातील तिकिट कन्फर्म झाले की नाही ते सुद्धा आठ तास आधी कळणार आहे.

आजपासून अशी होणार भाडेवाढ

भारतीय रेल्वेच्या प्रवासी भाड्यातही आजपासून वाढ होत आहे. ही भाडेवाढ मेल, एक्सप्रेस आणि सुपरफास्ट गाड्यांच्या विविध वर्गांमध्ये लागू होईल. जनरल तिकिटासाठी ५०० किलोमीटरपर्यंत कोणतीही भाडेवाढ नाही. वातानुकूलित आणि शयनयान श्रेणी या दोन्ही प्रकारच्या डब्यांमध्ये भाडेवाढ लागू केली जाईल. एसी चेअर कार, एसी थ्री टियर, थ्री इकॉनॉमी, एसी टू टियर, एसी फर्स्ट क्लास आणि एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये प्रति किलोमीटर दोन पैसे भाडेवाढ केली आहे. तसेच शयनयान श्रेणीत आणि सेकंड क्लाससाठी प्रति किलोमीटर एक पैशाची भाडेवाढ करण्यात आली आहे. रेल्वेने लोकल गाड्या आणि पासधारकांना या भाडेवाढीतून वगळले आहे.

नवीन प्रणालीमुळे तिकिटांची फास्ट बुकींग

रेल्वे डिसेंबर २०२५ पर्यंत एक नवीन प्रवासी आरक्षण प्रणाली सुरू करणार आहे, ज्यामुळे तिकीट बुकिंग सध्याच्या तुलनेत ५ पट जलद होईल. सध्या एका मिनिटात ३२ हजार तिकिटे बुक केली जातात. परंतु नवीन पीआरएसमुळे १ मिनिटात १.५ लाख तिकिटे बुक केली जातील. याशिवाय एका मिनिटात ४० लाख जणांना चौकशी करता येतील. नवीन प्रवासी आरक्षण प्रणालीमुळे, वेगवेगळ्या भाषांमध्ये तिकिटे सहजपणे बुक करता येतील.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.